साहित्य क्षेत्रात विश्वविक्रम- ——-मातृभक्त आचार्य सी ए. डॉ . प्रा . शंकर घनशामदास अंदानी यांचा जागतिक विक्रम,एकाच दिवशी स्व लिखित १०६ पुस्तके प्रकाशितजगातील सर्वात जास्त कवितांचे काव्य संग्रह–आई विषयावर ५१२१ कविता ,लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स , OMG बुक आफ वर्ल्ड रेकॅर्द्स मध्ये सी ए श्री शंकर अंदानी यांच्या कामाची नोंद व विक्रंम नोंद
पुणे, प्रतिनिधी : साई इंडिअन ट्रस्ट असोसिएशन (सिता ट्रस्ट) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १०६ पुस्तक विमोचन तथा ऐतिहासिक साहित्य विश्व विक्रम पंजीकरण कार्यक्रमाने पुणे शहरात एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी पर्व साकारले. मातृभक्त, आचार्य सी.ए., प्रा. डॉ. शंकर घनश्यामदास अंदानी यांचेयांचे स्व लिखीत १०६ पुस्तकांचे विमोचन तसेच जगातील सर्वात मोठे आई विषयी ५१२१ कवींचे संयुक्त संपादित काव्यसंग्रह प्रकाशन सोहता पुणे येथे पार पडले मातृभक्त, आचार्य सी.ए., प्रा. डॉ. शंकर घनश्यामदास अंदानी संपादनाखाली पार पडलेल्या या भव्य सोहळ्याने साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र आणले.
पत्रकार भवन ऑडिटोरियम हॉल, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात , साहित्य क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरलेल्या या उपक्रमाची नोंद London Book of Records आणि India Proud Book of Records OMG बुक आफ वर्ल्ड रेकॅर्द्स या प्रतिष्ठित संस्थांकडून करण्यात आली.
सदर कार्यक्रमामध्ये साहित्य सम्बन्धी ५ आंतरराष्ट्रीय विक्रम नोद्न्विण्यात आले
एकाच लेखकाचे श्री शंकर अंदानी यांचे एकाच दिवशी १०४ पुस्तके प्रकाशित करणे
जगातील सर्वात मोठे ५१२१ कवितांचे आई विषयी हिंदी काव्य संग्रह प्रकाशित करणे
एकाच दिवशी श्री शंकर अंदानी लिखित १२१०० कवितांचे प्रकाशन करणे
बहिण यांचे आदर्श दाखविणारी ११६१ कवितांचे प्रिया ताई हे मराठीतील सर्वात मोठे काव्य संग्रह श्री शंकर अन्द्णाई लिखित प्रकशित करणे
वडील विषयी बाबा अबोल जीवनाचे कोडे हे वडील यांचे संपादित मराठीतील सर्वात मोठे ११६१ कविताचे काव्य संग्रह प्रकाशित
यावेळी तिन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते सहभागी सरही शंकर अंदानी यांना जागतिक नोंद प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या सन्मानामुळे नवोदित तसेच प्रस्थापित लेखकांच्या साहित्यसेवेला जागतिक स्तरावर मान्यता मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सी ए शंकर अंदानी यांना जागतिक साहित्यिक मान्यता प्रदान्न करण्यात आली .
या प्रसंगी योगगुरु महामंडलेश्वर श्री कृष्ण गिरी महाराज, पद्मश्री दादासाहेब तसेच पुणे पुस्तके मेळावा चे अश्यक्ष तसेच भारतीय जनता पक्ष राज्य कार्यकारणी सदस्य आदरणीय श्री राजेश पांडे तसेच महारष्ट्र सहकारी बँक चे मुख प्रशसक श्री विद्याधर अनास्कर ,पद्मश्री श्री दादासाहेब इदाते , पद्मश्री उदय देशपांडे, पद्मश्री चैतराम पवार,, श्री सुनील वेदपाठक ( निवृत्त न्यायाधीश ), श्री अभिजीत जोशी ( जेष्ठ शास्त्र लेखक ) , श्री सुधीर तारे सर ( नोबेल nominator सौ. मंदा नाईक जेष्ठ कवयित्री पुणे , सौ. शैलजा करोडे जेष्ठ कवयित्री – मुंबई , सौ. सुमंगल सुमन मुंबई , श्री आशुतोष तिवारी मध्य प्रदेश , श्री धारीवाल दिल्ली , श्री नागेश्वर मोकाशी हुबळी कर्नाटका , श्री रामकरण साहू लखनौ उतर्प्रदेश , श्री अनुज श्रीवास्तव राजस्थान , सौ. चारूशीला बिडवे मुंबई , श्री मंजू गुप्ता दिल्ली आणि डॉ. सारिका गायकी अमरावती तसेच देशातील अनेक लेखक कवी साहितीयिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात साहित्य संवर्धन, वाचन संस्कृतीचा प्रसार आणि भारतीय ज्ञानपरंपरेचे जतन यावर विशेष भर देण्यात आला. डॉ. शंकर घनश्यामदास अंदानी यांच्या नेतृत्वाखाली साकारलेल्या या उपक्रमाने साहित्य क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला असून अनेक लेखकांसाठी तो प्रेरणादायी ठरला आहे.
साहित्य, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा सोहळा पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
संपूर्ण भारतात एवड्या मोठ्या प्रमाणात साहित्य शेत्रातील हा पहिलाच कार्यक्रम पूर्ण अत्मियीत्याने पार पडला . सी ए शंकर अंदानी यांना जागतिक मान्यता प्रदान्न करण्यात आली
------साहित्य क्षेत्रात विश्वविक्रम- -------
जगातील सर्वात जास्त कवितांचे काव्य संग्रह – आई विषयावर ५१२१ कविता ,
मातृभक्त आचार्य सी ए. डॉ . प्रा . शंकर घनशामदास अंदानी यांचा विक्रम,
तसेच एकाच दिवशी स्व लिखित १०६ पुस्तके प्रकाशित
लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सी ए श्री शंकर अंदानी यांच्या कामाची नोंद व विक्रंम नोंद
हिंदी साहित्य क्षेत्रात एकाच दिवशी १०४ स्वलिखित पुस्तके प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम अहिल्या नगर चे सुप्पुत्र सी ए शंकर अंदानी यांनी केला आहे तसेच आई मा कि ममता मा अनेकता कि शक्ति नावाने जगातील सर्वात जास्त कवितांचे हिंदी कविताचे पुस्तक प्रकाशित करीत आहे
सदर पुस्तक काव्य संग्रह मध्ये संपूर्ण भारतातील १४० कवी यांचे हिंदी मधील कविता संकलित करून एक विशाल असे काव्य संग्रह प्रकाशित करीत आहे . आता पर्यंत इतके मोठे काव्य संग्रह संपूर्ण जगात कोणीही केले आहे सदर अत्यंत अवघड संकलन श्री शंकर अंदानी यांनी पूर्ण केले आहे
तसेच त्याच सी ए शंकर आंदणी यांनी लिहिलेल्या एकूण १२१०० कविता चे वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये प्रकाशन होत आहे , हा सुधा एक विश्व विक्रम आहे
अशा प्रकारे साहित्य विश्व मध्ये सर्वोच सांख्य असलेले कवितासंग्रह , सर्वात जास्त कविता प्रकाशित करणे तसेच एकाच दिवशी १०६ पुस्तके प्रकाशित करणे हे अत्यंत मोठे आव्हान श्री शंकर आंदणी यांनी पूर्ण केले आहे .
तसेच वडील ,बाबा अबोल जीवनाचे कोडे हे संपूर्ण महारष्ट्रातील ८० कवींचे संकलन केलेले ११६१ कवितांचे मराठी भाषेतील कविता संग्र्ह्र प्रकाशित करीत आहे , त्याच प्रमाणे बहिण माझी प्रिय ताई या नांवाने ११६१ कवितांचे बहिणी वरील कवितांचे संग्रह प्रकाशित करीत आहे
अशा प्रकारे साहित्य क्षेत्रात एकाच दिवशी ५ विश्वविक्रम सी ए शंकर अंदानी यांचे नांवावर नोंद होणार आहे .
अत्नार्राष्ट्रीय विश्विक्रम नोंद करणारी लंडन येथील लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच भारतातील सर्वात जास्त प्रसिद्ध असलेली व सर्व भारतीय यांचे राष्ट्रीय विक्रम नोंद करणारी भारतातील सर्वात मोठी संस्था इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स ने अहमदनगर येथील प्रसिद्ध सनदी लेख् पाल सि ए शंकर घन्शामदास अंदानी यांचे कामाची व विक्रमाची नोंद केलेली आहे .
सदर कार्यक्रम ३० मे २०२६ रोजी पुणे येथे अनेक नामवंत राजकीय नेते , साहित्यिक लेखक कवी यांचे उपस्थ्तीत पुणे येथे होणार आहे .
सि ए शंकर अंदानी हे मागील अनेक वर्षा पासून समाज कार्य करीत आहेत तसेच त्यांचे कामकाज व्यवसाय हे अनेक मंदिर , धर्म शाळा, सामाजिक संस्था, चर्च , मस्जिद तसेच अनेक सामाजिक संस्था यांचे कामकाज अत्यंत अल्प दारात किंवा विना मूल्य करीत आहेत .
त्यांचे हे काम ३६४ मंदिर, मस्जिद , चर्च, सामाजिक संस्था यांचे कामकाज २०२२ मध्ये त्याची केले हे विक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स ने नोंद केले व त्यास मंजुरी दिलेली आहे तशी माहिती /indiabookofrecords.in या त्यांच्या अंतर्राष्ट्रिया वेब साईट वर टाकली आहे
भारतातील सर्व स्थरातील उत्कर्ष कार्य व व विक्रम करणे करिता सदर कार्यालय अत्यंत मोजके व ठराविक व्यक्तींना त्यांचे कार्य व कामकाज यांची पूर्ण पणे छाननी व तपासणी करून त्यांची नोंद जागतिक विक्रम मध्ये करीत असते
अहमदनगर येथील सी ए (DR ) श्री शंकर घन्शामदास अंदानी यांना या पूर्वी युनायटेड नेशन अमेरिका, राष्ट्र अध्यक्ष कार्यालय अमेरिका या कार्यालयाचा मेडल ऑफ EXCELLENCE , उत्कृष कार्य नोंद , हा अत्यंत मनाचा सर्वोच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे .
सदर विक्रमनोंद प्राप्त होणारे श्री अंदानी हे जगातील बहुदा पहिलेच व्यक्ती आहेत .
सी ए श्री शंकर अंदानी यांना या पूर्वी जवळ पास ३१८० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कर मिळाले आहेत , तसेच त्यांचे नवे ११५ जागतिक रेकॉर्ड्स ची नोंद आहे तसेच त्यांचे नावे १५० होनोररी डॉक्टरेट मिळालेलं आहे
श्री शंकर अंदानी हे व्यवसायाने सि ए . आहेत . ते श्री साई बाबा संस्थान टस्ट शिर्डी यांचे मागील १८ वर्ष पासून कर सालागार कामकाज करीत होते . तसेच अहिल्या नगर नगर महा नगर पालिका यांचे ते मागील २० वर्ष पासून कर सालागार आहेत तसेच अनेक शासकीय संस्था व बँक, पतसंस्था यांचे ते लेख परीक्षक व कर सल्लागार कामकाज करीत आहेत.
सदर पुरस्कार करिता श्रिडी चे खासदार श्री भाऊसाहेब वाघचौरे माजी खासदार सदाशिव लोखंडे, संगमनेर चे श्री सुधीर तांबे , अहिल्या नगर चे खासदार श्री निलेश जि लंके साहेब अहमदनगर चे आमदार संग्राम अरुण काका जगताप, अहमदनगर सिधी समाज अध्यक्ष श्री महेश मध्यान तसेच अनेक सन्माननीय लोकांनी – सी ए श्री शंकर अंदानी यांचे अभिनंदन केले आहे .
