May 30, 2026

सीतेशिवाय रामराज्याची कल्पना पूर्ण होऊ शकत नाहीविश्व हिंदू परिषदेचे मार्गदर्शक भैय्याजी जोशी यांचे विचारएमआयटी डब्ल्यूपीयूत ‘सीतेची न सांगितलेली कथा’ पुस्तकाचे प्रकाशन

0
IMG-20260528-WA0025
Spread the love

पुणे, २८ मेः ” शस्त्र हे कधीच शांती निर्माण करु शकत नाही. त्यातून विनाशच होतो. शांती प्रस्थापितेसाठी हे नष्टच करावे लागेल. रामायणातील या संदेशाबरोबरच आदर्श लक्ष्मण रेषेचे महत्व समजावून घ्यावे. त्यासाठी मर्यादा गरजेची आहे अन्यथा विनाश अटळ आहे. रामराज्याची कल्पना ही आदर्श आहे परंतू हे सीतेशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.” असे विचार विश्व हिंदू परिषदेचे मार्गदर्शक भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.
मोतीलाल बनारसीदास पब्लिशर्स, भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन आणि माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकन ज्युईश लेखिका डेना मरियम यांनी मुळ इंग्रजी पुस्तक ‘द अनटोल्ड स्टोरी ऑफ सीता’ याचे मराठी अनुवादीत ‘सीतेची न सांगितलेली कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन एमआयटी डब्लयूपीयूत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सन्माननीय पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी भारतीय विचार साधना, पुणे प्रकाशनचे कार्यवाह काशीनाथ देवधर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस आणि प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ.संजय उपाध्ये उपस्थित होते.
या कार्यक्रमाला एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचा शुभाशिर्वाद होता. तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल वि. कराड यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न झाला.
भैय्याजी जोशी म्हणाले,” सीतेचा जन्म शरीर रचनेच्या पलिकडे म्हणजे भूमिपूत्र आहे. दैवी आत्मा म्हणून राम आणि सीतेकडे पाहावे. या दोघांनी सकारात्मक दृष्टीकोन घेऊन जे कार्य केले आहे ते धर्म कार्य आहे. युवकांकडून धर्म रक्षण व्हावे यासाठी विश्वामित्रांनी समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे. रामायणातील प्रसंग प्रासंगिक असून राजा हा राज्याचा स्वामी नाही तर दायित्व घेऊन निघालेला असतो.”
“सीतेने सांगितले की व्यक्ती सुखी असावी परंतू सुखासीन नसावी. प्रजेच्या रक्षणासाठी राजाने विचार करुन कार्य करावे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार हे प्रजेला समजायला हवे. गुरूकुल हे विद्यार्थ्यांना विचार करायला शिकविणारे आहेत. आकलन करावे त्यानंतर विचारांच्या आधारेच हा देश पुढे घेऊन जाता येईल. असे ही भैय्याजी जोशी यांनी सांगितले.”
काशीनाथ देवधर म्हणाले,” हिंदूत्वाबद्दल पसरलेल्या गैरसमजाबद्दल या पुस्तकात नोंद आहे. साध्वी डेना मरियम यांनी लिहिलेल्या या पुस्तकात सहनियोजनाचे कार्य सोपविण्यात आले.”
डॉ.संजय उपाध्ये म्हणाले,” प्रभू रामांचे आदर्श आजही सुसंगत आहेत आणि समाजाला योग्य दिशा दाखवतात. सत्य, नीतिमत्ता आणि सन्मानाच्या मार्गाचे अनुसरण करुन एक आदर्श समाज घडवता येतो. भारतीय स्त्रीच्या मानात या पुस्तकात स्त्रीचे, धैर्य आणि सामर्थ्याच्या तिच्या व्यक्त आणि अव्यक्त जगावरील प्रेमाची आणि सर्वांच्या कल्याणासाठी केलेल्या निःस्वार्थ त्यागाची कथा आहे.”
डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,” एलटीसी म्हणजे लाइफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर हे निर्सगाशी जुळलेले आहे. वर्तमानकाळात ज्या पद्धतीने निसर्गाचा ह्यास होत आहे. त्याबद्दल या पुस्तकात काही विचार मांडण्यात आले आहे.”
मुकुंद हिरवे यांनी प्रास्ताविकेत सांगितले की,” रामायणातील कोड्यांची वैध आणि समर्पक उत्तरे हे ‘सीतेची न सांगितलेली कथा’ या मराठी पुस्तकात सापडेल. सीतामातेच्या आयुष्याच्या पारंपरिक कथानकाऐवजी महान नारायणी देवीचा अवतार असलेल्या सीतामातेला तिच्या खर्‍या स्वरुपात सादर करते. ज्या काळात मानव निसर्गापासून दुरावत चालला होता त्या काळात एका नवीन संस्कृतीचा पाया घालण्यासाठी श्रीरामांसोबत सामील होण्याकरिता सीतामाता पृथ्वीवर येते.”
तन्मय गाडगीळ व शिवानी हिरवे यांनी लेखिकेचा आणि पुस्तकाचा परिचय करुन दिला. सूत्रसंचालन पुस्तकाचे समन्वयक मुकुंद हिरवे यांनी केले. डॉ. मिलिंद पात्रे यांनी आभार मानले.

जनसंपर्क विभाग,
एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी