डाबर पुदीन हराने ‘वंडर हर्ब’ पुदिन्याचे महत्त्व अधोरेखित केले
पुणे, १९ मे २०२६ : आयुर्वेदिक वनस्पतींचे फायदे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या आपल्या ध्येयाला पुढे नेत भारतातील सर्वात मोठी विज्ञानाधारित आयुर्वेद कंपनी डाबर इंडिया लिमिटेड ने पुदिनाला एक ‘अद्भुत औषधी वनस्पती’ म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. पुदिना अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्सने समृद्ध असून, विशेषतः कडक उन्हाळ्यात मानवी पोटासाठी अत्यंत लाभदायक ठरतो.
उष्णतेच्या लाटा आणि वाढत्या तापमानामुळे उन्हाळ्यात आरोग्याच्या समस्या सातत्याने वाढताना दिसत आहेत. या वाढत्या हंगामी आरोग्य समस्यांवर उपाय म्हणून डाबरने दिवसभर उन्हात राहणाऱ्या आणि उन्हाळ्यातील सामान्य आजारांना बळी पडणाऱ्या लोकांसाठी पुदिनाच्या वापराचा प्रचार सुरू केला आहे.
“आधुनिक काळातील अनेक आजारांवरील उत्तम उपाय आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये दडलेले आहेत. पुदिनाचा इतिहास सुमारे ३,००० वर्षांपूर्वीचा असून त्याला ‘अद्भुत औषधी वनस्पती’ म्हणून ओळखले जाते, जी मानवी पचनसंस्थेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. पुदिनामधील मेंथॉल पचनासाठी आवश्यक एन्झाइम्स सक्रिय करते, पोटातील स्नायूंना आराम देते आणि अपचन व पोटदुखीचा त्रास कमी करण्यास मदत करते. तसेच अॅसिडिटी आणि गॅसच्या समस्यांवरही ते प्रभावी मानले जाते,” असे डॉ. निकिता जगताप यांनी सांगितले.
आज बाजारात अनेक अँटॅसिड्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये अॅल्युमिनियम/मॅग्नेशियम हायड्रॉक्साइडसारखी तीव्र रसायने असतात. यांचा नियमित वापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. डाबरचा १०० वर्षांहून अधिक जुना ब्रँड ‘पुदीन हरा’ हा पुदिना सत्वाच्या गुणांनी युक्त आयुर्वेदिक उपाय असून गॅस, अपचन, पोटदुखी आणि अॅसिडिटी यांसारख्या पोटाच्या समस्यांवर जलद आणि प्रभावी आराम देतो. पुदीन हरा गोळ्या, लिक्विड आणि ‘पुदीन हरा फिझ’ या पावडर स्वरूपात उपलब्ध आहे, जे अॅसिडिटीसाठी नैसर्गिक उपाय मानले जाते.
या कार्यक्रमात बोलताना श्री. श्रीराम पद्मनाभन, संचालक – विपणन, डाबर इंडिया लिमिटेड म्हणाले, “जीवनशैली आणि कामकाजाच्या बदलत्या पद्धतींमुळे आजचे ग्राहक सतत अनेक कामे एकाच वेळी करत असतात. त्यामुळे त्यांना प्रभावी आणि नैसर्गिक उपायांची गरज असते.
सर्वात विश्वासार्ह हेल्थकेअर कंपनी म्हणून डाबर दैनंदिन आरोग्य समस्यांवर पारंपरिक आयुर्वेदिक उपायांचा प्रसार करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि पुदीन हरा हा अनेक पोटाच्या विकारांवर खात्रीशीर उपाय आहे. उन्हाळ्यात वाढणाऱ्या विविध आजारांच्या पार्श्वभूमीवर पुदीन हरा अपचन, गॅस आणि अॅसिडिटी यांसारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो.”
पुदीन हरा विषयी:
डाबर पुदीन हरामध्ये मुख्य घटक म्हणून पुदिना सत्वाचा समावेश असून ते अपचन, गॅस आणि पोटदुखी यांसारख्या समस्यांवर जलद आणि प्रभावी आराम देण्यासाठी ओळखले जाते. १००% नैसर्गिक घटकांनी युक्त असलेले पुदीन हरा हे सुरक्षित आणि विश्वासार्ह उपाय मानले जाते.
