May 21, 2026

मनातील गुंतागुंत वाढविणारा ‘दृश्य-अदृश्य’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित…

0
IMG-20260519-WA0019
Spread the love

नेहमीच वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा एका ज्वलंत विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आपल्या डोळ्यांना दिसतं ते सत्य की आपल्याला होणारे भास खरे या अनाकलनीय कोड्याचे उत्तर शोधणारा ‘दृश्य-अदृश्य’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारे कथानक, आघाडीच्या कलाकारांचा सर्वोत्तम अभिनय आणि कुशल दिग्दर्शन असलेला ‘दृश्य-अदृश्य’ हा चित्रपट १९ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ५६व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव म्हणजेच ‘इफ्फी’मध्ये या चित्रपटाने जागतिक पातळीवरील प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यात यश मिळविले. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेल्या या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

आरएसटी कॅनव्हास निर्मित ‘दृश्य-अदृश्य’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाची निर्मिती प्रद्योत पेंढारकर, अनिल वर्खडे, दत्ताजी थोरात, धनंजय थोरात, पृथ्वीराज खेडकर, युवराज खेडकर आणि अश्विनी खेडकर यांनी केली आहे. आजवर बऱ्याच आशयघन यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या मिलिंद लेले यांनी ‘दृश्य-अदृश्य’चे दिग्दर्शन केले आहे. दिग्दर्शनासोबतच ‘दृश्य-अदृश्य’चे कथा-पटकथा लेखन मिलिंद लेले यांनीच केले असून, संवाद अस्मिता कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. ‘जे दिसतं तेच खरं असतं का?’ हा प्रश्न विचारत ‘दृश्य अदृश्य’ या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. ‘२५ लाख रुपयांच्या इन्सेन्टिव्हचं सिक्रेट’ टिझरमधील रहस्य आणखी गडद करणारे असून, चित्रपटाबाबत कुतूहल जागविणारं आहे. ‘डोळ्यांवर विश्वास ठेवायचा की मनावर?’ हा प्रश्न उपस्थित करीत ‘दृश्य अदृश्य’चा टिझर मनातील गुंतागुंत आणखी वाढवतो. भास आणि सत्य यात खूप मोठं अंतर असल्याचे टिझर अधोरेखित करतो. ‘माणूस ओळखणं कठीण की सत्य?’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी