May 18, 2026

-लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात ‘दशावतार’ दर्शन

0
IMG-20260518-WA0031
Spread the love

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट : अधिक ज्येष्ठ महिन्यानिमित्त आयोजन

पुणे : अधिक ज्येष्ठ महिन्याच्या निमित्ताने बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी भगवान विष्णू यांच्या दहा अवतारांची माहिती आणि जगत्प्रतिपालक दशावतार दर्शविणाऱ्या आकर्षक प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. संपूर्ण अधिक महिना या प्रतिमा मंदिरामध्ये प्रदर्शित करण्यात येतील. या विशेष उपक्रमाचे अनावरण महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते माध्यान्ह आरतीनंतर करण्यात आले.

दत्त मंदिरात लावलेल्या दशावतारांच्या प्रतिमांचे मोठ्या उत्साहात भाविक दर्शन घेत आहेत. अधिक महिन्याच्या धार्मिक परंपरा आणि त्यामागील आध्यात्मिक महत्त्व जाणून घेत होते. ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांनी अधिक महिन्याचे धार्मिक आणि खगोलशास्त्रीय महत्त्व स्पष्ट केले.

ते म्हणाले, सौर वर्ष आणि चांद्र वर्ष यांच्यातील ताळमेळ राखण्यासाठी हिंदू पंचांगानुसार दर ३२ ते ३३ महिन्यांनी येणारा अतिरिक्त चांद्र महिना म्हणजे अधिक महिना होय. हा महिना पुरुषोत्तम मास, मलमास किंवा ‘धोंड्याचा महिना’ म्हणूनही ओळखला जातो.

हा महिना भगवान विष्णू आणि श्रीकृष्णांना समर्पित मानला जात असल्याने या काळात पूजा, जप, उपवास, दान आणि तीर्थयात्रेला विशेष महत्त्व असते. तसेच या महिन्यात सुवर्ण किंवा चांदीच्या दिव्याचे दीपदान, अपूपदान (अनारसे) तसेच घेवर, मैसूरपाक, बत्तासे यांसारख्या जाळीदार पदार्थांचे दान करण्याची परंपराही श्रद्धेने पाळली जाते. या महिन्यात मंदिरामध्ये वाण देण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात.

  • फोटो ओळ : अधिक ज्येष्ठ महिन्याच्या निमित्ताने बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी भगवान विष्णू यांच्या दहा अवतारांची माहिती आणि जगत्प्रतिपालक दशावतार दर्शविणाऱ्या आकर्षक प्रतिमा लावण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी