‘ओन्ली माईन’ गाऊन दर्शन रावलने पुणे कॉन्सर्टमध्ये प्रेमाची जादुई मोहिनी पसरवली
प्रेमाची चाहूल! पुणे कॉन्सर्टमध्ये दर्शन रावलने आपल्या नव्या ‘ओन्ली माईन’ गाण्याने रंगवला प्रेमाचा माहोल
१० मे रोजी कोथरूड येथील पेठकर ग्राउंडवर आयोजित करण्यात आलेल्या ‘साऊंड ऑफ लव्ह’ या पुणे कॉन्सर्टमध्ये दर्शन रावलने आपल्या सुरांनी पुन्हा एकदा जादू केली. नेहमीप्रमाणेच रावलने आपल्या चाहत्यांवर प्रेमाची मोहिनी घातली, मात्र यावेळी ती अधिक खास ठरली कारण त्याने नुकतेच प्रदर्शित झालेले ‘ओन्ली माईन’ हे गाणे प्रथमच लाईव्ह सादर केले. भावपूर्ण शब्द आणि आकर्षक संगीतामुळे प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
‘ओन्ली माईन’ या गाण्याचा मुख्य विषय म्हणजे मन व्यापून टाकणारे प्रेम — असे नाते जे अनंत आणि भारावून टाकणारे वाटते. आपल्या आधीच्या सुपरहिट गाण्यांमध्ये प्रेमातील गोडवा दाखवणाऱ्या दर्शनने ‘ओन्ली माईन’मध्ये प्रेमातील सुंदर गोंधळ आणि समर्पणाची भावना अधोरेखित केली आहे. हाच वेगळेपणा प्रेक्षकांच्या मनाला भिडला. कॉन्सर्टपूर्वी दर्शनने आपल्या ‘ब्लू फॅमिली’ला (त्याच्या चाहत्यांना) गाण्याचे शब्द पाठ करण्याचे आवाहन केले होते आणि त्यामुळे संपूर्ण मैदानात ‘ओन्ली माईन’सह त्याच्या इतर लोकप्रिय गाण्यांचे सूर घुमत होते.
इतर कॉन्सर्ट्सपेक्षा वेगळे म्हणजे, दर्शन रावलने आपल्या प्रेमगीतांमधून प्रेक्षकांना रोमँसची कोमलता आणि सूक्ष्म भावना अनुभवायला लावल्या. त्यामुळे हा कॉन्सर्ट फक्त ‘वाइब’ करण्यापुरता न राहता, प्रत्येकाने तो मनापासून ‘फील’ केला. आणि कदाचित म्हणूनच प्रेक्षक आता दर्शनकडून आणखी काही खास ऐकण्यासाठी अधिक उत्सुक झाले आहेत. त्याच्या या नव्या कॉन्सर्टला आणि ‘ओन्ली माईन’ गाण्याला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता, २०२६ च्या उत्तरार्धात अपेक्षित असलेल्या त्याच्या आगामी अल्बममध्ये लाईव्ह इन्स्ट्रुमेंटेशनचा प्रभाव अधिक जाणवू शकतो
