श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील 10 च्या विद्यार्थ्यांचा 100 टक्के निकाल
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे संचलित जय गणेश ज्ञानवर्धन अभियान अंतर्गत जय गणेश विद्यार्थी पालक योजनेमधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.
94.40% गुण मिळवून समीक्षा भोसले या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच 85.60% गुण मिळवून आदित्य दहिवलीकर या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक मिळवला.
समीक्षा भोसले हिला मर्चंट नेव्ही मध्ये करिअर करण्याची इच्छा आहे.
तर आदित्य दहिवलीकर पीएसआय व्हायचे आहे
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या पालकत्व योजनेचा अत्यंत मोलाचा लाभ झाला अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
त्यासाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सर्व विश्वस्तांनी केलेल्या मार्गदर्शना प्रित्यर्थ मनापासून आभार व्यक्त केले.
