April 20, 2026

“संजीवनी जीवनरक्षक पुरस्कार–२०२६” ची घोषणा; जीव वाचवणाऱ्यांचा होणार सन्मान

0
IMG-20260420-WA0018
Spread the love

हेल्प रायडर्सचा पुढाकार


मानवतेची सेवा आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्पर मदत या उद्देशाने कार्यरत असलेल्या हेल्प रायडर्स संस्थेने समाजात एक वेगळी आणि सकारात्मक ओळख निर्माण केली आहे. वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकांना मार्ग मोकळा करून देणे, अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोहोचवणे तसेच आपत्कालीन प्रसंगी मदतीसाठी धावून जाणे ही संस्थेची प्रमुख वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी ठरली आहे.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत कनोजिया यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ उभी राहिली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक स्वयंसेवक समाजसेवेत सक्रिय झाले आहेत. कोरोना काळात प्लाझ्मा, औषधे आणि अत्यावश्यक वस्तू पुरवून संस्थेने अनेकांचे प्राण वाचवले. तसेच पूरग्रस्त भागात मदतकार्य आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे.

सध्या संस्थेचे कार्य विविध शहरांमध्ये विस्तारले असून शेकडो स्वयंसेवक या सेवाकार्यात सहभागी झाले आहेत.

पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना हेल्प रायडर संस्थेचे अध्यक्ष प्रशांत कनोजिया म्हणाले की, “समाजात जीव वाचवण्याच्या कार्यात योगदान देणारे, अपघातग्रस्तांना मदत करणारे किंवा आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने पुढाकार घेणाऱ्या नागरिकांनी संस्थेशी संपर्क साधावा.”

महाराष्ट्रासह देशभरातील अशा उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनी पुढे येऊन आपल्या कार्याची नोंद संस्थेकडे करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी हेल्प रायडर चे समन्वयक अनुपम शहा,बाळासाहेब ढमाले,श्रीकांत कापसे, उपस्थित होते.

पुण्यात शनिवार दि. ६ जून २०२६ रोजी “संजीवनी जीवनरक्षक पुरस्कार–२०२६” सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या पुरस्काराचे हे पहिले वर्ष असून, यापुढे दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली.

पुरस्काराचे स्वरूप : ट्रॉफी, सन्मानचिन्ह, शाल आणि नारळ.

📞 अधिक माहितीसाठी व सहभाग नोंदणीसाठी संपर्क : 9970239999

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी