April 20, 2026

महिलांच्या समान अधिकाराचा फुले आंबेडकरी विचार काँग्रेसला नामंजूर ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

0
IMG-20260419-WA0048
Spread the love

मुंबई दिनांक 19 – महात्मा जोतिबा फुले ; क्रांतिज्योत सावित्रीमाई फुले आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना स्वातंत्र्य ; समान अधिकार स्त्री पुरुष समानतेचा विचार मांडला तोच समतेचा विचार शिरोधार्य मानून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विधानसभा – लोकसभेत महिलांना 33 टक्के राजकीय आरक्षण देणारे महिला आरक्षण विधेयक संसदेत मांडले. महिलांना न्याय देणाऱ्या या विधेयकाला काँग्रेस पक्षाने विरोध करून संसदेत हे विधेयक नामंजूर केले. महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षात महिलांना न्याय देणारे विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेसचा बुरखा फाटला आहे.काँग्रेस चा खरा चेहरा समोर आला आहे.महात्मा जोतिबा फुले सावित्रीमाई फुले आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महिलांना समान अधिकार देण्याचा विचार काँग्रेसला मंजूर नसल्याचे संसदेत स्पष्ट झाले आहे. महिला आरक्षण विधेयक नामंजूर करणाऱ्या काँग्रेस ला फुले आंबेडकरी विचार मंजूर नसल्याचे सिद्ध झाले आहे.त्यामुळे काँग्रेस ने यापुढे फुले आंबेडकरांचे नाव घेऊ नये त्यांना या महापुरुषांचे नाव घेण्याचा अधिकार नाही अशी घणाघाती टीका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज केली.

संसदेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर आज ना.रामदास आठवले मुंबई आल्या नंतर त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे काँग्रेस वर टीका केली.महिला आरक्षण विधेयक संसदेत नामंजूर झाल्याचे आसुरी आनंद काँग्रेस ने साजरा केल्याबद्दल ही ना. रामदास आठवले यांनी टीका केली.

महिला आरक्षण विधेयक हे भारतीय स्त्रियांच्या जीवनात राजकीय पटलावर समान अधिकार आणणारे क्रांतिकारी विधेयक ठरले आहे.पंडित नेहरूंच्या सरकार मध्ये संसदेत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनीदिलेल्या हिंदू कोड बिलास तत्कालीन काँग्रेस च्या लोकप्रतीनीधींनी विरोध केला होता. आजही महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणारे काँग्रेसचेच लोकप्रतिनिधी होते. महात्मा फुलेंच्या देशताब्दी जयंती वर्षात महिलांचा समान राजकीय अधिकार नाकारण्याचे पाप काँग्रेस पक्षाने केले आहे.आगामी निवडणुकीत महिला वर्ग काँग्रेस ला मतपेटीतून धडा शिकवेल असा टोला ना. रामदास आठवले यांनी काँग्रेस ला लगावला.

हेमंत रणपिसे
प्रसिद्धी प्रमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी