April 14, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आशिर्वादामुळेच मला केंद्रीयमंत्री पदाची संधी मिळाली – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

0
IMG-20260414-WA0015
Spread the love

मुंबई/दिल्ली दि. 13 – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रचंड मोठी आहे शक्ती, जगभरात करोडो लोक करतात त्यांची भक्ती, जगातील सर्वश्रेष्ठ विद्वान प्रज्ञासुर्य म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्ववंदनीय आहेत. त्यांचा मला आशिर्वाद आहे, त्यांच्या आशिर्वादामुळेच मला केंद्र सरकारमध्ये तिस-यांदा केंद्रीय राज्यमंत्री पदाची संधी मिळाली आहे. मी बौध्द आहे, मी सर्व जाती धर्मीयांना न्याय देण्याचे काम करीत राहणार. मी कुणालाही घाबरत नाही. मुझे नही किसी का डर, क्योंकी मेरे पिछे है बाबासाहेब आंबेडकर असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.

नवि दिल्लीतील मावळणकर सभागृह येथे भारतीय बौध्द संघाच्या वतीनं महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमीत्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ना. रामदास आठवले बोलत होते. यावेळी विचारमंचावर माजी केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नकवी, तरुण चुग, समता सैनिक दलाचे ए.आर. जोशी, तसेच या कार्यक्रमाचे संयोजक भारतीय बौध्द महासंघाचे प्रमुख भंते डॉ. संघप्रीय राहुल, लतिका शर्मा, लालसिंह आर्या, राजकुमार आनंद, ज्ञानचंद्र गौतम, मुकेश सिरोही, बी. प्रताप आदि मान्यंवर उपस्थित होते.  

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखी जगात कुणाचीही जयंती साजरी होत नाही. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जगात सर्वात मोठया प्रमाणात साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. संविधान बदलण्याची भाषा कोणी करु नये, हे संविधाना कुणालाही बदलता येणार नाही. जोपर्यंत चंद्र सुर्य आहे तोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान राहील असे ना. रामदास आठवले म्हणाले.  

हेमंत रणपिसे
प्रसिध्दीप्रमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी