June 3, 2026

हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयाचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

0
IMG-20260224-WA0031
Spread the love

हिंगोली (जिमाका), दि. 24 : न्यायिक जिल्हा परभणी येथून हिंगोली येथे स्वतंत्र जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आली होती. त्यानुसार न्यायिक जिल्हा हिंगोली अस्तित्वात आला. याच्या वर्षपूर्तीनिमित्त दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली येथे प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा वकील संघाचे अध्यक्षर अॅड. श्रीधर घुगे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली उपस्थित होते.
येथील जिल्हा वकील संघाच्या वतीने आयोजित हा वर्धापन दिन कार्यक्रम जिल्हा न्यायालय परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 श्रीमती एस. एन. माने-गाडेकर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर. एम. रोटे, दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) व्ही. एम. मानखैर, मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती ए. बी. कुरणे, सह दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) श्रीमती व्ही. व्ही. सावरकर, द्वितीय सह दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) पी. जी. महाळकर, द्वितीय सह दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) डी. व्ही. भंडारी, तृतीय सह दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) श्रीमती एस. एस. पळसुले यांच्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ विधीज्ञ, वकील व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा वकील संघाचे सचिव अॅड. मिलिंद कांबळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष अॅड. डी. बी. खंदारे यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी