July 1, 2026

सनसिटी परिसरात महा आरोग्य शिबीर २०२५ शनिवारी (दि.१३)सुहासिनी प्रतिष्ठान व शिवसमर्थ प्रतिष्ठान तर्फे आयोजन

0
IMG-20251212-WA0065
Spread the love


पुणे : सुहासिनी प्रतिष्ठान व शिवसमर्थ प्रतिष्ठानतर्फे महा आरोग्य्ग शिबीर २०२५ चे आयोजन शनिवार, दिनांक १३ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ यावेळेत करण्यात आले आहे. सनसिटी, माणिकबाग, नवीन डीपी रोड, सिंहगड रस्ता येथे आयोजित शिबीरात मोफत तपासणी, उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत, अशी माहिती शिबीराच्या आयोजिका मंजुषा नागपुरे यांनी दिली.

शिबीरामध्ये मोफत रक्ततपासणी, हृदय आजार, ईसीजी तपासणी, मोतीबिंदू, काचबिंदू, पडद्याच्या शस्त्रक्रिया, दंत तपासणी व दंत उपचार, कॅन्सर आजार उपचार, केमोथेरपी, रेडिएशन, शस्त्रक्रिया, खुब्याची शस्त्रक्रिया, किडनी स्टोन, दुभंगलेले/ फाटलेले ओठ शस्त्रक्रिया, हाडांची ठिसूळता, मधुमेह, डायलेलीस, ऍक्युप्रेशर यासंह संपूर्ण शरीराची तपासणी व औषध वाटप केले जाणार आहे.

हे शिबीर दीपक नागपुरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आले असून पुण्यातील २० हून अधिक नामांकित रुग्णालयांचे तज्ञ सहभागी होणार आहेत. पुणेकरांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील आयोजिका मंजुषा नागपुरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी