May 17, 2026

युवा संत चिंतन वर्ग’ मराठी स्मरणिकेचे प्रकाशनजगद्गुरू संत श्रेष्ठ पूज्य रविदासजी मंदिर वर्धापन दिन ; विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांची उपस्थिती

0
IMG-20251212-WA0055
Spread the love


पुणे : कात्रज येथील पूज्य संत गुरु रविदास महाराज मंदिरात २२ वा वर्धापन दिन भक्तिभावाने साजरा झाला. याविशेष प्रसंगी शिर्डी येथील युवा संत चिंतन वर्गाची मराठी स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.

प्रकाशन सोहळ्यास विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या सोबत रविदास धर्म संघटनचे राष्ट्रीय अध्यक्ष पूज्य संत सुखदेव महाराज, तसेच संघटनचे केंद्रीय पदाधिकारी, स्मरणिकेचे संपादक व विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र व गोवा राज्य धार्मिक विभाग प्रमुख संजय मुरदाळे, तसेच पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते.

ही स्मरणिका युवा संत चिंतन वर्गातील प्रमुख सत्रे, धर्म कार्याची दिशा, संघटनात्मक मार्गदर्शन, प्रांतनिहाय कार्ययोजना आणि धर्माचार्य संपर्क आयामाच्या उपक्रमांचे सविस्तर चित्रण करणारे महत्वपूर्ण दस्तावेज ठरणार आहे. .

आलोक कुमार म्हणाले, युवा संतांचे चिंतन हे समाज आणि राष्ट्र या दोन्हींसाठी ऊर्जा देणारे शक्तिकेंद्र आहे. शिर्डीच्या युवा संत वर्गाने दिलेली दिशा ही हिंदू समाजासाठी अतिशय मोलाची आहे. स्मरणिका त्या विचारांची नोंद ठेवणारा महत्त्वाचा आधार आहे, असेही त्यांनी सांगितले. पूज्य संत सुखदेव महाराज म्हणाले, नव्या पिढीतील संत विचार व साधनेची परंपरा पुढे नेत आहेत. धर्म, समरसता आणि संस्कार यांचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हेच त्यांचे महत्तम कार्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

  • फोटो ओळ : कात्रज येथील पूज्य संत गुरु रविदास महाराज मंदिरात २२ वा वर्धापन दिन भक्तिभावाने साजरा झाला. याविशेष प्रसंगी शिर्डी येथील युवा संत चिंतन वर्गाची मराठी स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी