वाढत्या बांधकाम परवानग्या, अनेक मजली – उंच इमारतींची बांधकामे, सार्व प्रक्ल्प, उद्याने, क्रीडांगणे, पुरेशी वहातुक व्यवस्था व गरजेचे रस्ते यांचा अभाव विषयी .. १ दिवसीय चर्चासत्र – परिसंवाद..
शुक्रवार दि ११ सप्टे रोजी स १० वा. – पत्रकार भवन, नवी पेठ पुणे …!
पुणे प्रतिनिधी :
विद्येचे माहेरघर, शैक्षणीक हब असलेल्या पुणे शहराचा विकास वेगाने होत असून वहातुक समस्यांना पावलो पावली सामोरे जातांना महानगराचा विकास सुनियोजित पद्धतीने आणि नगर नियोजन विभागाच्या निर्देशानुसार, टीपी व डीपी नुसार होत आहे का(?) याचा मागोवा घेणाऱ्या परिसंवादाचे आयोजन राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. ११ रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी एक या वेळेत पत्रकार संघ येथे हा परिसंवाद होणार आहे अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सीओइपी’चे माजी प्रा. प्रताप रावळ, वास्तु विशारद मकरंद शेंडे, भोला वांजळे, आबा जगताप, संजय अभंग , नंद कुमार पापळ, अनिल धिमधिमे इ सदस्य उपस्थित होते.
परिसंवादा बद्दल अधिक माहिती देताना तिवारी म्हणाले, राजीव गांधी स्मारक समिती शहराच्या विकासावर सातत्याने पाठपुरावा करत असते. प्रत्येक शहराचा विकास त्याच्या नैसर्गिक जडण – घडणी नुसार होणे आवश्यक असते. पुणे शहराचा विकास नगर नियोजन विभागाने आखून दिलेल्या पद्धतीने होत आहे का? यूडीसीपीआर आणि एचसीएमटीआरनुसार यशस्वी ठरलेले विकासाचे मॉडेल पुणे शहर प्रशासन शहरात प्रत्यक्षात दाखवू शकते का? नैसर्गिक घटकांचा प्रभाव लक्षात घेऊन पर्यावरणपूरक पद्धतीने शहराच्या विकासाचे काम सुरू आहे का..?
बांधकाम परवाने देण्याची सध्याची पद्धत नागरिकांसाठी आणि शहराच्या नियोजनासाठी व अंतर्गत वहातुकीस तारक, मारक वा अघिक उग्र ठरणार (?) अशा विविध बाजुंनी महत्त्वपूर्ण व ज्वलंत ठरणाऱ्या समस्या व धोके यावर या परिसंवादात चर्चा होणार आहे.
क्रेडाईच्या अहवालानुसार शहरात सध्या 93 हजारांहून अधिक घरे विक्री अभावी पडून असल्याचे नमूद केले आहे, अशा परिस्थितीत पुण्याच्या वाढत्या शहरीकरणामुळे वाहतूक, पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा, मलनिस्सारण, पर्यावरण, उंच इमारतींची बांधकामे आणि नागरी नियोजनासमोर निर्माण झालेली आव्हाने यावरही परिसंवादात विचारमंथन होणार आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नुकतेच शहरात 6 हजार कोटी चौरस फुटांची नवीन बांधकामे होणार असल्याचे नमूद केले आहे, असे मकरंद शेंडे यांनी सांगितले. तर शहराच्या विस्ताराने पुण्याच्या लोकसंख्ये ची घनता वाढणार असल्याच्या प्रश्नांकडे प्रा. रावळ यांनी लक्ष वेधले.
या परिसंवादामध्ये माजी खासदार वंदना चव्हाण, माजी महापालिका आयुक्त महेश झगडे, पर्यावरण तज्ज्ञ सारंग यादवाडकर, सीओइपी’चे माजी प्रा. प्रताप रावळ, वास्तु विशारद मकरंद शेंडे, संग्राम खोपडे, पर्यावरण तज्ज्ञ प्राजक्ता दिवेकर, वास्तु विशारद शिरीष केंभावी, सहकारी गृहनिर्माण सोसायटी महासंघाचे सुहास पटवर्धन आदि सहभागी होणार आहेत.
तसेच यामध्ये महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी, चंदू कदम यांच्यासह सर्वपक्षीय आजी-माजी आमदार, विविध राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार असून पुणेकर नागरीक व संबंधित घटकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन देखील या चर्चा सत्राचे सषोजक व निमंत्रक राजीव गांधी स्मारक समिती तर्फे करण्यात आले आहे..
भोला वांजळे यांनी आभार प्रदर्शन केले..!
मा संपादक –
दै वृत्तसंस्था स न वि वि
कृपया वरील वृत्तांत आपल्या लोकप्रिय दै वृत्तपत्रात प्रसिद्ध करून सहकार्य करावे ही विनंती..!
आपला विश्वासू
(भूपाल पंडित)
मो. 97303 84211
प्रसिद्धी सहाय्यक – प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी संपर्क कार्यालय, अक्षय श्री सोसा, २१६ नारायण पेठ, केळकर रस्ता, पुणे ३०
