September 9, 2026

डिजे ” ही एक विकृतीच म्हणावी लागेल…. बॉऊंडलेस स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य.

0
sanvidhan_news_150x150
Spread the love


मानसिक आणि शारीरिक या दोन्हीला हानिकारक आणि एकार्थी जीवघेणी सुद्धा असलेली ही कलियुगातील डिजे सारख्या पाश्चात्य संस्कृतीवर खरोखरच बंदीच असली पाहिजे. अक्षरशः अत्यंत पवित्र्य असलेल्या श्री. गणेशोत्सवाचे पावित्र्य हे उध्वस्त होताना दिसत आहे,श्री.गणेशाची आराधना,मनोभावे प्रार्थना,पूजाअर्चा,न दिसता कर्कर्ष आवाज,अर्थहीन गाणी,त्यावरील अत्यंत विभत्स नाच आणि अनेक तरुणाई तर विविध नशेत बेधुंद अवस्थेत आढळतात यामुळे कुठेही या उत्सवाचे गांभीर्य व पावित्र्य दिसून येत नाही…
कोणताही धर्म अशी किळसवाणी कृत्य करायला सांगत नाही तरीही अशी धर्म संस्कृती विरोधी परंपरा का चालू झाली ? याचे कारण आजची धर्मांध व जातीपातीवरील चालू असलेली राजकीय परिस्थिती हे सद्सदविवेक बुद्धि जागृत ठेवली तर सहज कळेल.
केवळ वर्चस्वासाठी तरुणाईला भरकटून ,दिशाहीन केल्या जात आहे. हे मान्यच करावे लागेल.खऱ्या अर्थाने कायदा सुव्यवस्थेचे व जनतेच्या मनातील शुद्ध भावनेचे अर्थात प्रत्येक धार्मिक सणांचे महत्त्व व पावित्र्य अबाधित रहावे यासाठी कायद्याने जे नियम घालून दिले आहेत ते पाळल्या गेलेच पाहिजे.ज्यामध्ये आवाजाची मर्यादा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण या डीजेच्या कर्कश आवाजाने अनेकांचे मानसिक संतुलन बिघडले आणि अनेक जणांचे जीवही गेल्याचे तसेच डिजेतील विद्युत लेझर लाईट ने तर अनेकांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत सुद्धा झालेली असल्याचे विविध प्रसिद्धी माध्यमातून वाचले आहे,त्यातच याच डीजेच्या आवाजाने वयोवृद्धांच्या व लहान कोवळ्या वयाच्या मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो याचेही भान असले पाहिजे…कारण प्रत्येकाच्या घरात वयोवृद्ध आणि लहान मुलं आहेत.
काही तासांच्या किंवा काही दिवसांच्या या सणामुळे अनेकांच्या आरोग्यावर व भवितव्यावर जणू संकटेच कोसळलीत ही वस्तुथिती कोणी नाकारू शकत नाही.म्हणून कोणाच्याही धार्मिक भावना न दुखावता प्रत्येकाने आपापल्या धर्माचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी व जनतेच्या आरोग्यासाठी या डीजेचा हट्ट न धरता सणांचे महत्त्व जाणून सर्वोतोपरी जनहितार्थ साठी कायद्याचे पालन करणे हीच खऱ्या अर्थाने श्री.गणेशाची भक्ती व आराधना असावी…. हीच अपेक्षा महाराष्ट्रातील गणेश मंडळाकडून ….
आपले ,लतेंद्र भिंगारे अध्यक्ष,बॉऊंडलेस स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी