April 18, 2026

बंधुभाव मजबुत तर देश मजबुत – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

0
IMG-20260416-WA0031
Spread the love

अल्पसंख्यांक आघाडीच्या वतीने जोगेश्वरीत भिमजयंती साजरी

मुंबई दि. 16 – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातुन सर्व जाती धर्मीयांना न्याय दिला आहे. भारतात हिंदुची लोकसंख्या जास्त आहे पाकिस्तानातील मुस्लिमांच्या संख्येपेक्षा भारतात मुस्लिमांची लोकसंख्या जास्त आहे. भारत हा सर्वधर्मसमभाव बाळगणारा देश आहे. सर्व जाती धर्मात बंधुभावाची भावाची भावना वाढवली पाहिजे. जेवढी बंधुभावाची भावना वाढेल तेवढा देश मजबुत होईल. बंधुभाव मजबुत तर देश मजबुत असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.

रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष सोहेल शेख यांनी किल्लेदार कंपाऊंड, जोगेश्वरी पश्चिम येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीचे आयोजन केले होते. यावेळी भिमजयंती निमीत्त ना. रामदास आठवले यांच्या हस्ते रेशन किट वाटप करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीचे मुंबई अध्यक्ष सोहेल शेख आणि त्यांच्या सहका-यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा भव्य पुष्पाहाराने सत्कार केला. या कार्यक्रमात दलित आणि मुस्लिमांनी एकत्र येवुन भिमजयंतीचा उत्सव साजरा केला.

आपल्या देशात जात , धर्म, प्रांत, भाषा वेगवेगळया असल्या तरी आपला देश एक आहे. भारतीय संविधानाने आपली राष्ट्रीय एकात्मता मजबुत केली आहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी बंधुत्वाची भावना वाढवणे महत्वाची आहे. भारतीय संविधानाने सर्व जाती धर्माप्रमाणे मुस्लिम समाजालाही न्याय दिलेला आहे. 27 टक्के ओबीसी आरक्षणातुन मुस्लिम समाजातील ओबीसींनाही आरक्षणाचा लाभ मिळतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात नव्यान सुरु झालेल्या 10 टक्के आर्थिकदृष्टया मागास आरक्षणाचा मुस्लिम समाजालाही लाभ मिळतो. प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री आयुष्यमान योजना आदि अनेक योजनांचा मुस्लिम समाजाला लाभ मिळतो. त्यामुळे मोदी सरकार कोणाशीही भेदभाव करीत नाही. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान भारतात जोपर्यंत आहे तोपर्यंत या देशातील मुस्लिमांना कोणताही धोका नाही. मुस्लिमांच्या रक्षणासाठी रिपब्लिकन पक्षाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. सद्या लव जिहाद या संकल्पनेचा बाऊ केला जात आहे. मात्र लव जिहादवर रिपब्लिकन पक्षाचा विश्वास नाही. जातीभेद निर्मुलनासाठी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याची भुमिका रिपब्लिकन पक्षाची आहे असे ना. रामदास आठवले यावेळी म्हणाले. यावेळी रिपब्लिकन अल्पसंख्यांक आघाडी मुंबई प्रदेशाध्यक्ष सोहेल शेख, जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव, अजगर शेख, इश्तेखार अहमद शेख, मोहम्मद शेख, जलाल शेख, अमन काजी, फरीद कुरेशी, इब्राहिम शेख, सुनिल पवार, शाह आलम आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते.

हेमंत रणपिसे
प्रसिध्दीप्रमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी