February 15, 2026

राज्यस्तरीय एनजीओ क्षमता बांधणी कार्यशाळा संपन्नमहा एनजीओ फेडरेशन च्या वतीने ; महाराष्ट्रातून १०० हून अधिक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांची उपस्थिती

0
IMG-20250916-WA0052
Spread the love

पुणे: महाराष्ट्रातील २५०० हून अधिक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महा एनजीओ फेडरेशन तर्फे आयोजित राज्यस्तरीय एनजीओ क्षमता बांधणी कार्यशाळा उत्साहात पार पडली. राठी हॉल, महेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, शिवाजीनगर येथे झालेल्या या कार्यशाळेत राज्यभरातील १०० पेक्षा अधिक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व प्रतिनिधी सहभागी झाले.

शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून, कार्यशाळेचे यशस्वी संयोजन महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे व योगेश बजाज यांनी केले. ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे, अपूर्वा करवा, कोमल गांधी, राहुल जगताप, विठ्ठल काळे आदींनी समन्वयक म्हणून भूमिका बजावली.

कार्यशाळेत एनजीओचे कायदेशीर अनुपालन, व्यवस्थापन, डिजिटल साधनांचा व सोशल मीडियाचा वापर, सीएसआर व निधी संकलनाच्या संधी तसेच प्रकल्प प्रस्ताव लेखन यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. सेंटर फॉर इ-गव्हर्नन्सचे संचालक सूरज पोळ, क्षमता बांधणी तज्ञ विनायक गारडे, वाय फोर डी चे अध्यक्ष प्रफुल निकम, सीएसआर तज्ञ मकरंद लेले आणि रोस्ट्रम इंडिया सोशल ऑर्गनायझेशनचे संचालक वैभव मोगरेकर यांनी आपले विचार मांडले. कार्यशाळेत संस्थापक शेखर मुंदडा यांच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून कार्यशाळेची सुरवात झाली.

अमोल उंबरजे म्हणाले, या कार्यशाळेतून सामाजिक संस्थांची क्षमता वाढवून त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सामाजिक प्रकल्प राबवता येतील. समाजाला अधिक व्यापक पातळीवर मदत व्हावी हा या क्षमता बांधणी कार्यशाळेमागील मुख्य हेतू आहे. कार्यशाळेचे सूत्रसंचालन पायल मुजुमदार यांनी केले तर आभार मुकुंद शिंदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी