June 23, 2026

परिहार चौक परिसरातील अतिक्रमणावर कारवाईचे आश्वासन; सनी निम्हण यांचा पाठपुरावा

0
IMG-20260622-WA0028
Spread the love

पुणे, दि. २२ जून २०२६ :
प्रभाग क्र. ८ मधील परिहार चौक ते वेस्टर्न मॉल परिसरातील सार्वजनिक फुटपाथवर होत असलेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याने नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या मा. उपआयुक्त यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

सदर परिसरातील फुटपाथ हे पादचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षित वापरासाठी राखीव असताना काही ठिकाणी त्यांचा वापर वास्तव्यासाठी व इतर कारणांसाठी केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत असून वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढला आहे.

या संदर्भात स्थानिक नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत असल्याने सार्वजनिक सुविधा, स्वच्छता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा विषय प्रशासनासमोर गांभीर्याने मांडण्यात आला. नागरिकांसाठी उपलब्ध असलेले फुटपाथ अतिक्रमणमुक्त ठेवणे, परिसरात स्वच्छता राखणे आणि सुव्यवस्था कायम ठेवणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी मा. उपआयुक्त यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित विभागामार्फत तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल तसेच नागरिकांच्या गैरसोयी दूर करण्यासाठी प्रशासन योग्य ती पावले उचलेल, असे आश्वासन दिले.

प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षितता, सुविधा आणि जीवनमानाशी संबंधित प्रश्नांबाबत पुढेही सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी