February 16, 2026

पी एम किसान सन्मान निधीचा मच्छीमारांना लाभ मिळवून देणार ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

0
IMG-20250802-WA0019
Spread the love

मत्स्यशेतीला भारत सरकारने कृषीचा दर्जा देण्याच्या मागणीचे मच्छीमारांनी दिले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना निवेदन

मुंबई दि.2 ~ मत्स्यशेतीला महाराष्ट्र राज्य सरकारने कृषीचा दर्जा दिला आहे.त्याप्रमाणे भारत सरकारने ही मत्स्यशेतीला कृषीचा दर्जा द्यावा यासाठी आपण केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेणार आहोत.मत्स्यशेतीला केंद्र सरकार ने कृषीचा दर्जा दिल्यास पी एम किसान सन्मान निधीचा लाभ मच्छीमारांना मिळवून देता येईल.त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिले.
पी एस किसान सन्मान निधी च्या 20 व्या हफ्त्याचा वितरण सोहळा मुंबईत वर्सोवा येथील केंद्रीय मत्स्य शेती संस्थेच्या सभागृहात आयोजक करण्यात आला होता. यावेळी दृकश्राव्य माध्यमातून प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून देशभरात शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीच्या 20व्या हफ्त्याचे वितरण करण्यात आले.
वर्सोवा येथील केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित पी एम किसान सन्मान निधी वितरण कार्यक्रमात मुंबईतील मरोळ आणि वर्सोवा येथिल मच्छीमार संघटनेच्या प्रतिनिधींनी पी एम किसान सन्मान निधी चा लाभ मच्छीमारांना मिळवून देण्याच्या मागणीचे निवेदन केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दिले.त्यावेळी आपण मत्स्यशेतीला कृषीचा दर्जा देऊन मच्छीमारांना पी एम किसान सन्मान निधीचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी दिले.यावेळी मच्छीमारांना उपयुक्त वस्तूंचे वाटप ना. रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन न.रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेचे देवजीत शर्मा; डॉ स्वदेश प्रकाश; अर्पिता शर्मा; संजय बुकोलिया आदी मान्यवर तसेच मच्छीमार संघटनेच्या अध्यक्षा राजश्री भानजी; राजेश नाखवा आदी मान्यवर उपस्थित होते.

हेमंत रणपिसे
प्रसिद्धी प्रमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी