February 15, 2026

गानवर्धनतर्फे शनिवारी होणार गौरवडॉ. उपेंद्र सहस्त्रबुद्धे यांना अप्पासाहेब जळगावकर स्मृती पुरस्कार

0
IMG-20250616-WA0043
Spread the love



पुणे : गानवर्धन संस्थेतर्फे प्रसिद्ध संवादिनी वादक डॉ. उपेंद्र सहस्त्रबुद्धे यांचा कै. पंडित अप्पासाहेब जळगावकर संवादिनी वादक पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभ शनिवार, दि. 21 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजता बेडेकर गणपती मंदिर, कोथरूड येथे आयोजित करण्यात आला असून पुरस्काराचे वितरण सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक, पंडित अतुलकुमार उपाध्ये यांच्या हस्ते होणार आहे. शाल, सन्मानपत्र आणि रुपये दहा हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
शास्त्रीय संगीतामध्ये गायन, वादन आणि नृत्य यांना साथसंगत करणारे आणि संवादिनीला स्वतंत्र प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे सुप्रसिद्ध ज्येष्ठ संवादिनीवादक कै. पंडित अप्पासाहेब जळगावकर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त त्यांचे शिष्य डॉ. उपेंद्र सहस्त्रबुद्धे यांचा गौरव करण्यात येत आहे. त्यांनी अनेक मोठमोठ्या कलाकारांना शास्त्रीय गायन, अभंग, नाट्यसंगीत अशा मैफिलीत साथसंगत केली आहे. संवादिनी वादन या विषयावर प्रात्यक्षिक व्याख्यान अशा प्रकारचा कार्यक्रमही ते सादर करतात. पंडित अप्पासाहेब जळगावकर यांचे संवादिनी वादन कौशल्य हा त्यांचा संशोधनाचा विषय आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त डॉ. सहस्त्रबुद्धे यांचा स्वतंत्र संवादिनी वादन कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर विदुषी कै. वीणा सहस्त्रबुद्धे यांची शिष्या, पुण्यातील युवा गायिका सानिका कुलकर्णी यांच्या शास्त्रीय गायनाची मैफल आयोजित करण्यात आली आहे. कलाकारांना प्रसिद्ध तबलावादक अमित जोशी साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
फोटो : डॉ. उपेंद्र सहस्त्रबुद्धे
फोटो : सानिका कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी