अॅमेझॉन आणि फ्लक्सजेन पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कॅम्पसमध्ये जलसंधारण प्रकल्प राबवणार, दरवर्षी १७८ दशलक्ष लिटर पाण्याचे पुनर्भरण करणार
३८० एकरांच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एनसीएल) कॅम्पसमध्ये एकात्मिक जल व्यवस्थापन यंत्रणा लागू केली जाईल.
पाण्याचा वापर कमी करण्यासाठी, सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करण्यासाठी आणि भूजल पुनर्भरण करण्यासाठी स्मार्ट सेन्सर्स व कार्यक्षम यंत्रणा बसवल्या जातील.
अॅमेझॉनने नुकतेच भारतात वॉटर पॉझिटिव्ह दर्जा प्राप्त केला आहे, कंपनी आपल्या सर्व कामकाजात जेवढे पाणी वापरते त्यापेक्षा जास्त पाणी पर्यावरणाला परत करत आहे.
पुणे, भारत | सप्टेंबर ११: अॅमेझॉन इंडियाने पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या (एनसीएल) संशोधन कॅम्पसमध्ये एकात्मिक जलसंधारण प्रकल्प राबवण्यासाठी वॉटर टेक्नॉलॉजी स्टार्टअप फ्लक्सजेनसोबत सहयोगाची घोषणा केली आहे. ३८० एकरांच्या कॅम्पसमध्ये पसरलेला हा प्रकल्प या वर्षाच्या अखेरीस पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी अंदाजे १७८ दशलक्ष लिटर पाण्याचे पुनर्भरण करेल, अशी अपेक्षा आहे. पाण्याचा वापर कमी करण्यासाठी, सांडपाणी गोळा करून त्यावर प्रक्रिया व पुनर्वापर करण्यासाठी आणि संपूर्ण कॅम्पसमध्ये भूजल पुनर्भरण करण्यासाठी हा प्रकल्प स्मार्ट सेन्सर्स, तसेच एरेटर आणि वॉटरलेस युरिनल्ससह कार्यक्षम उपकरणांचा वापर करेल. हा सहयोग अॅमेझॉनच्या भारतातील व्यापक जलसंधारण प्रयत्नांचा भाग आहे, जेथे कंपनीने आपल्या कामकाजात वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या १२० टक्के पाणी समाज आणि पर्यावरणाला परत देऊन २०२७ च्या उद्दिष्टापूर्वीच वॉटर पॉझिटिव्ह होण्याचे ध्येय नुकतेच साध्य केले आहे (where the company recently achieved its goal of becoming water positive).
“फ्लक्सजेनसोबत हा सहयोग भारतातील जलसंधारणाबाबत आमची दृढ कटिबद्धता दर्शवतो. तंत्रज्ञानावर आधारित उपाय मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष बदल घडवून आणू शकतात हे दाखवण्यासाठी पुण्यातील एनसीएल कॅम्पस हे आदर्श ठिकाण आहे. येथे एकात्मिक जल व्यवस्थापन उपायांमध्ये गुंतवणूक करून आम्ही केवळ स्थानिक पाण्याच्या आव्हानांवर मात करण्यासोबत मॉडेल तयार करत आहोत, जे देशभरातील कार्यालये, व्यावसायिक जागा, शाळा, हॉस्पिटल्स, बहु-गृहनिर्माण संकुल आणि संस्थात्मक कॅम्पसमध्ये लागू केले जाऊ शकते. अॅमेझॉनमध्ये आमचा विश्वास आहे की, जबाबदार जल व्यवस्थापन आवश्यक आहे आणि यासारखे सहयोग आम्हाला समाजावर तात्काळ प्रभाव पाडण्यास आणि दीर्घकालीन पर्यावरणीय फायदे मिळवून देण्यास मदत करतात,” असे अॅमेझॉन इंडियाच्या ऑपरेशन्सचे डायरेक्टर करण चुघ म्हणाले.
“एनसीएलमध्ये आमचा नेहमी विश्वास राहिला आहे की, वैज्ञानिक संशोधनाचे रूपांतर प्रत्यक्ष जगावरील प्रभावात झाले पाहिजे. अॅमेझॉन आणि फ्लक्सजेनसोबत या सहयोगामुळे आम्हाला आमचा कॅम्पस शाश्वत जल व्यवस्थापनाच्या मॉडेलमध्ये रूपांतरित करण्याची संधी मिळाली आहे. स्मार्ट सेन्सर्स, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचा पुनर्वापर आणि भूजल पुनर्भरण यांची सांगड घालणारा हा एकात्मिक दृष्टिकोन समाजाच्या फायद्यासाठी विज्ञानाचा विस्तार करण्याच्या आमच्या दृष्टिकोनाशी जुळणारा आहे. हा प्रकल्प देशभरातील संशोधन संस्थांसाठी एक मापदंड ठरेल, अशी आम्ही अपेक्षा करतो,” असे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या कंट्रोलर ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन कनिका गोयल म्हणाल्या.
“सर्वसमावेशक जल व्यवस्थापन यंत्रणेच्या निर्मितीसाठी एकाच ठिकाणी विविध जल तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करणे, ही या प्रकल्पाची वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे,” असे फ्लक्सजेनचे सीईओ आणि फाऊंडर (संस्थापक) गणेश शंकर म्हणाले. “स्थानिक जलसुरक्षेत योगदान देत संशोधन संस्था अधिक शाश्वतपणे काम करू शकतात, याचे एनसीएल कॅम्पस आदर्श उदाहरण बनेल.”
या प्रकल्पात २०२७ मध्ये सुरू होणाऱ्या प्रायोगिक शिक्षण उपक्रमाचा देखील समावेश आहे, ज्याचा उद्देश तरुणांमध्ये जलसंधारणाविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे. या उपक्रमात जल व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या एनसीएल कॅम्पसला दर तीन महिन्यांनी होणाऱ्या भेटी, स्थानिक शाळांमध्ये जलसंधारण क्लबची स्थापना आणि परस्परसंवादी खेळाच्या माध्यमातून जलसंधारणाची तत्त्वे शिकवणारा शैक्षणिक बोर्ड गेम “हायड्रोक्वेस्ट”चा समावेश असेल.
नुकतेच अॅमेझॉनने भारतात वॉटर पॉझिटिव्ह (water positive) झाल्याची घोषणा केली आहे, याचाच अर्थ कंपनी आता देशभरातील कॉर्पोरेट कार्यालये, डेटा सेंटर्स आणि फुलफिलमेंट सेंटर्ससह आपल्या सर्व कामकाजात जेवढे पाणी वापरते त्यापेक्षा जास्त पाणी समाजाला परत करत आहे. अॅमेझॉनने २०२७ पर्यंत भारतात वॉटर पॉझिटिव्ह होण्याचे उद्दिष्ट ठेवले होते आणि ते आता वेळेपूर्वीच साध्य केले आहे. कंपनीने महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली एनसीआर, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये जलसंधारण उपक्रमांसाठी ६२ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी देण्याची कटिबद्धता दर्शवली आहे. हे प्रकल्प पाणलोट क्षेत्र पुनर्संचयित करणे, तलावांचे पुनरुज्जीवन, कार्यक्षम सिंचन, भूजल पुनर्भरण आणि स्थानिक गरजांनुसार तयार केलेल्या पाण्याच्या दर्जा सुधारणा उपक्रमांच्या माध्यमातून दरवर्षी ४ अब्ज लिटरहून अधिक पाण्याचे पुनर्भरण करतील, अशी अपेक्षा आहे. अॅमेझॉनच्या पाणी पुनर्भरण प्रकल्पांविषयी अधिक माहितीसाठी [link] ला भेट द्या.
