अॅमेझॉन पे आणि कोटक महिंद्रा बँकेकडून लहान व्यवसायमालकांसाठी को-ब्रँडेड क्रेडिट कार्डची घोषणा
मुंबई, ९ सप्टेंबर २०२६: अॅमेझॉन पे आणि कोटक महिंद्रा बँक (“केएमबीएल”) यांनी आज सोल
प्रोप्रायटर्ससाठी आणि लहान व्यवसाय मालकांसाठी अॅमेझॉन पे कोटक बिझनेस क्रेडिट कार्डची
घोषणा केली. भारतातील लाखो व्यवसायांना सेवा देणारा डिजिटल खरेदी प्लॅटफॉर्म असलेल्या
‘अॅमेझॉन बिझनेस’च्या नोंदणीकृत वापरकर्त्यांसाठी हे कार्ड उपलब्ध असेल. हे कार्ड कॅशबॅक
रिवॉर्ड्स आणि अतिरिक्त व्याजमुक्त क्रेडिट कालावधी प्रदान करेल, ज्यामुळे उद्योजकांना खेळते
भांडवल राखून ठेवून व्यावसायिक खरेदीचे अधिक कार्यक्षमतेने व्यवस्थापन करण्यास मदत होईल.
भारताचे एमएसएमई क्षेत्र, ज्यामध्ये उद्यम पोर्टलवर नोंदणीकृत ९४ दशलक्षपेक्षा 1 जास्त उपक्रमांचा
समावेश आहे, ते देशाच्या जीडीपीमध्ये ३० टक्क्यांपेक्षा जास्त 2 योगदान देते. तरीही, अनेक लहान
व्यवसाय मालकांना त्यांच्या व्यावसायिक गरजांसाठी विशेषतः डिझाइन केलेल्या औपचारिक
क्रेडिट उत्पादनांमध्ये पोहोच मिळत नाही. उद्योजक डिजिटल खरेदी, जीएसटी-सुसंगत नोंदी ठेवणे
आणि संरचनात्मक आर्थिक प्रक्रिया वाढत्या प्रमाणात स्वीकारत आहेत, तसतसे त्यांना खर्च, रोख
प्रवाह आणि व्यावसायिक कामकाज अधिक कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यात मदत करणाऱ्या
उपायांची मागणी वाढत आहे.
मयंक जैन, डायरेक्टर – क्रेडिट अँड लेंडिंग, अॅमेझॉन पे इंडिया म्हणाले, “अॅमेझॉन पे ने
भारतातील लाखो ग्राहकांसाठी कर्ज मिळवणे सुलभ केले आहे. आता आम्ही तेच काम लहान
व्यवसाय मालकांसाठी करत आहोत. अॅमेझॉन पे कोटक बिझनेस क्रेडिट कार्ड ही बांधिलकी
सोल प्रोप्रायटर्सपर्यंत आणि लहान व्यवसाय मालकांपर्यंत पोहोचवते, जे अॅमेझॉन बिझनेसच्या
७० टक्के ग्राहक आधाराचे प्रतिनिधित्व करतात. आम्ही या लहान व्यवसाय मालकांच्या गरजा
ऐकून हे कार्ड तयार केले आहे – अॅमेझॉन बिझनेसवर केलेल्या खरेदीवर पारदर्शक रिवॉर्ड्स आणि
कर्जाची उपलब्धता. कोटक महिंद्रा बँकेसोबत भागीदारी करून, आम्ही भारतातील उद्योजकांसाठी
एक आकर्षक पर्याय तयार करण्यासाठी लाखो व्यवसायांपर्यंत पोहोचलेल्या अॅमेझॉनच्या
व्याप्तीची आणि एसएमई कोटकच्या कौशल्याची सांगड घालत आहोत.”
1 https://msmeregistration.gov.in/default.aspx?utm
2 https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2142170®=48&lang=2
This is a Public document.
फ्रेडरिक डिसोझा, हेड – क्रेडिट कार्ड्स, कोटक महिंद्रा बँक म्हणाले, “लहान व्यवसाय हे भारतीय
अर्थव्यवस्थेचे इंजिन आहेत. ते वस्तूंचा पुरवठा करतात, रोजगाराच्या संधी निर्माण करतात आणि
प्रत्येक शहरात व नगरात व्यापार सुरू ठेवतात. हे काम ते अनेकदा मर्यादित टीम्स आणि
उल्लेखनीय साधनसंपत्तीच्या जोरावर करतात. सर्वात उठून दिसणारी गोष्ट म्हणजे ते किती धाडसी
आणि कल्पक (एंटरप्रायझिंग) आहेत. या विश्वासाला योग्य साधनांची जोड मिळायला हवी. हे कार्ड
हे व्यवसाय प्रत्यक्षात कसे चालतात याच्या अवतीभोवती लाभ प्रदान करेल, ज्यामध्ये रोख प्रवाह
सुलभ करणारा व्याजमुक्त क्रेडिट कालावधी, मोठ्या खरेदीसाठी नो कॉस्ट ईएमआय आणि ते
व्यवसाय वाढवण्यासाठी आधीच करत असलेल्या खर्चावर कॅशबॅकचा समावेश आहे. अॅमेझॉन पे
सह, आम्ही भारतातील व्यवसायांपर्यंत ते आधीच विश्वास ठेवत असलेल्या प्लॅटफॉर्मवर हे कार्ड
आणू शकतो.”
प्रस्तावित कार्डची वैशिष्ट्ये आणि फायदे
● प्राइम सदस्यांसाठी पात्र अॅमेझॉन बिझनेस खरेदी, तसेच फ्लाइट आणि हॉटेल बुकिंगवर ५
टक्के कॅशबॅक आणि नॉन-प्राइम सदस्यांसाठी ३ टक्के कॅशबॅक (मासिक क्रेडिट मर्यादेच्या
कमाल ५ टक्क्यांपर्यंत मर्यादित).
● अॅमेझॉन पे द्वारे बिले आणि रिचार्जवर २ टक्के कॅशबॅक आणि इतर सर्व खर्चांवर १ टक्के
कॅशबॅक.
● ४८ दिवसांपर्यंतचा व्याजमुक्त क्रेडिट कालावधी आणि पात्र खरेदीवर तीन महिन्यांचे नो कॉस्ट
ईएमआय.
● शून्य जॉईनिंग फी आणि ४९९ रुपये अधिक कर इतकी वार्षिक फी, जी ऑफ-अॅमेझॉन
(अॅमेझॉनव्यतिरिक्त केलेल्या) खरेदीवर ३ लाख रुपयांच्या पात्र वार्षिक खर्चावर माफ केली
जाईल.
● एआय सेवा, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि डेटा स्टोरेजसाठी एडब्ल्यूएस क्रेडिट्सवर लहान
व्यवसायांसाठी विविध ऑफर्स.
पात्रता
अॅमेझॉन बिझनेसवर नोंदणीकृत असलेले लहान व्यवसाय मालक अॅमेझॉन बिझनेसद्वारे
अॅमेझॉन पे कोटक बिझनेस क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकतील. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल
This is a Public document.
असेल, ज्यासाठी किमान कागदपत्रांची आवश्यकता आहे आणि पात्र अर्जदारांना काही
मिनिटांतच कर्जाचा निर्णय मिळू शकतो. तुमची उत्सुकता दर्शवण्यासाठी येथे क्लिक करा
