September 4, 2026

FDA-पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह!अँकर :चाकणमध्ये पानटपऱ्या सुरू आहेत… तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची दृश्यं समोर येत आहेत…

0
Screenshot_20260903_112310_WhatsApp
Spread the love

आणि धक्कादायक बाब म्हणजे शाळकरी व अल्पवयीन मुलांच्याही हातात पान-गुटखा दिसत आहे.
मग सवाल असा — FDA नेमकं करतंय तरी काय? आणि पोलीस प्रशासनाची कारवाईची मोहीम कुठे गायब झाली?
व्हॉइस ओव्हर :
ही दृश्यं चाकणमधील आहेत.
एका बाजूला शासनाकडून तंबाखूविरोधी जनजागृती केली जाते… अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर निर्बंध आहेत… पण दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळीच चित्र दाखवत आहे.
लहान मुलं आणि विद्यार्थी पान-गुटखा खाताना दिसत असतील, तर हे पदार्थ त्यांच्या हातात पोहोचतायत तरी कसे?
पानटपऱ्यांवर नियमित तपासणी होते का?
अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांवर किती कारवाया झाल्या?
आणि जर कारवाया होत असतील, तर चाकणमध्ये पुन्हा पुन्हा अशीच दृश्यं का दिसत आहेत?
FDA प्रशासनाला थेट सवाल —
फक्त कागदावर तपासणी आणि कारवाई दाखवायची, की प्रत्यक्ष मैदानात उतरून कारवाई करायची?
पोलीस प्रशासनालाही सवाल —
अवैध पानटपऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आणखी किती पुरावे आणि किती तक्रारींची वाट पाहणार?
मुलांच्या हातात पुस्तकं असायला हवीत… पण जर त्यांच्या हातात गुटखा दिसत असेल, तर ही केवळ पालकांची नाही, तर संपूर्ण प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.
समारोप :
चाकणमध्ये सुरू असलेल्या या पानटपऱ्यांची आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीची FDA आणि पोलिसांनी संयुक्तपणे तपासणी करणार का?
अल्पवयीन मुलांना विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी होणार?
की कारवाईच्या नावाखाली पुन्हा फक्त कागदी घोडेच नाचणार?
आता चाकणकरांच्या या प्रश्नाचं उत्तर FDA आणि पोलीस प्रशासनाला द्यावंच लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी