August 21, 2026

भारत सरकार, कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था म्हणून काम पाहणाऱ्या दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण आणि विकास मंडळाच्या पुणे विभागाच्या “अध्यक्ष” पदी पुणे

0
IMG-20260813-WA0017
Spread the love

महानगरपालिकेच्या मुख्य कामगार अधिकारी श्री. नितीन बाजीराव केंजळे यांची नियुक्ती दोन वर्षांकरीता (२७/३/२०२६ ते २६/३/२०२८) करण्यात आली आहे. दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण आणि विकास मंडळ हे संघटित, असंघटित आणि ग्रामीण कामगारांना कामगार हक्क, सामाजिक – आर्थिक समस्या आणि सरकारी कल्याणकारी योजनांवर शिक्षित आणि प्रशिक्षित करणे या उद्देशाने १९५८ साली स्थापना करण्यात आलेली संस्था आहे.

श्री. नितीन केंजळे यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाचा ३३ वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव असून त्यांनी त्यांचा प्रवास पुणे मनपा मध्ये शिपाई पदावर १९९३ साला पासून केला आहे. तदनंतर त्यांनी ज्यु. ग्रेड लेखनिक, लघुटंकलेखक ते कामगार अधिकारी असा प्रवास परीक्षा देत केला आहे. सध्या ते पुणे मनपा मध्ये मुख्य कामगार अधिकारी (उपायुक्त) म्हणून कामकाज पाहत आहेत. कामगारांसाठी राबविलेल्या कल्याणकारी योजना आणि मनुष्यबळ संसाधन मध्ये केलेले कामकाजाची पावती त्यांना यास्वरूपात मिळाली आहे.

दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण आणि विकास मंडळाच्या नियंत्रणाखाली सध्या ५० प्रादेशिक संचालनालये आणि मुंबई येथील सर्वोच्च प्रशिक्षण संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वर्कर्स एज्युकेशन) समाविष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी