August 6, 2026

ज्ञानदेव संगीत महोत्सव’ रविवारी

0
IMG-20260805-WA0016
Spread the love


पुणे : विलास जावडेकर डेव्हलेपर्स प्रस्तुत अभिनवगंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर संगीत कला अकादमी, पुणे आयोजित आणि उर्मी फौंडेशन यांच्या सहकार्याने ‘ज्ञानदेव संगीत महोत्सव २०२६’ रविवार, दि. ९ ऑगस्ट सायंकाळी ५ वाजता सारथी ऑडिटोरियम, छत्रपती शाहू महाराज रिसर्च इन्स्टिटयूट, बीएमसीसी रस्ता येथे होणार आहे.
या महोत्सवात विदुषी सानिया पाटणकर यांचे गायन, मुक्ती श्री यांचे कथक आणि पंडित रघुनाथ खंडाळकर व त्यांचे दोन्ही सुपुत्र शुभम आणि सुरंजन खंडाळकर हे आपली कला सादर करणार आहेत त्यांना पंडित प्रताप पाटील (पखवाज), पांडुरंग पवार (तबला), रोहिणी माने-परांजपे (निरूपण) यांची विशेष साथ असणार आहे.
ज्येष्ठ संगीतकार गुरुवर्य पंडित म. ना. कुलकर्णी यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने विदुषी सानिया पाटणकर यांचा गौरव केला जाणार आहे. महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
फोटो : पंडित रघुनाथ खंडाळकर, सानिया पाटणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी