पुण्याच्या मंगेश (यश) लोहोर याची आंतरराष्ट्रीय सुवर्णकामगिरी; Matrix Pro – Hair Transformer 2026 स्पर्धेचे विजेतेपद
पुणे : पुण्यातील Flying Scissor Unisex Salon & Academy चे संचालक व आंतरराष्ट्रीय हेअर स्टायलिस्ट मंगेश (यश) लोहोर यांनी थायलंडमधील बँकॉक येथे आयोजित Matrix Pro – Hair Transformer 2026 (MHT Men’s Color & Cut 2026) या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद पटकावत पुणे आणि भारताचा गौरव केला.
या स्पर्धेत भारतातील हजारो हेअर स्टायलिस्ट सहभागी झाले होते. सेमीफायनल फेरीत संपूर्ण पुण्यातून केवळ मंगेश (यश) लोहोर यांची निवड झाली होती. अंतिम फेरीत त्यांनी आधुनिक हेअरकट, आकर्षक हेअर कलर ट्रान्सफॉर्मेशन आणि उत्कृष्ट तांत्रिक कौशल्याच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकत विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेचे आयोजन Matrix Professional तर्फे करण्यात आले होते. विजेत्यांची निवड Aalim Hakim, Sam James, Vipul Chudasama, Melroy Dickson आणि Binaifer Pardiwalla या जागतिक दर्जाच्या परीक्षकांनी केली.
विशेष म्हणजे, मंगेश (यश) लोहोर यांनी यापूर्वी 2023, 2024 आणि 2025 या सलग तीन वर्षांत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवले असून, आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी भारताचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे.
सन 2017 मध्ये डेक्कन जिमखाना, पुणे येथे त्यांनी Flying Scissor Unisex Salon & Academy ची स्थापना केली. अत्याधुनिक प्रशिक्षण, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि गुणवत्तापूर्ण सेवेमुळे ही अकॅडमी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्थांपैकी एक बनली असून, येथील शेकडो विद्यार्थी आज देशातील नामांकित सलून व स्वतःच्या व्यवसायात यशस्वीपणे कार्यरत आहेत.
या यशाबद्दल मंगेश (यश) लोहोर यांनी Matrix Team, मार्गदर्शक, कुटुंबीय, सहकारी, विद्यार्थी आणि ग्राहकांचे आभार मानत, “हे यश माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आहे. भविष्यातही भारतीय हेअर इंडस्ट्रीचे नाव जागतिक स्तरावर अधिक उंचावण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत राहीन,” अशी भावना व्यक्त केली.
