July 29, 2026

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते समाजगुरूंचा सन्मान…

0
IMG-20260727-WA0053
Spread the love

पुणे, दि.27 : विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या, समाज अधिकाधिक ज्ञानशील, कर्मशील व्हावा म्हणून कार्यरत असलेल्या विविध क्षेत्रातील समाजगुरुंचा प्रातिनिधीक स्वरुपात गुरूपौर्णिमेनिमित्त सन्मान करण्यात येणार आहे. विद्या प्रबोधिनी आणि पुनर्निर्माण सोशल फाऊंडेशनच्या वतीने शुक्रवार दि. 31 जुलै रोजी होणाऱ्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्त्ो या समाजगुरूंना सन्मानित करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ आणि नोबेल पुरस्काराचे सहमानकरी डॉ. राजेंद्र शेंडे, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. भूषण पटवर्धन, लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, पुण्यातील पहिले कंपनी सचिव आणि पुणे सार्वजनिक सभेचे उपाध्यक्ष डॉ. अरविंद नवरे, ज्येष्ठ लेखक- संपादक आनंद हर्डीकर, लेखिका आणि अनुवादक मृणालिनी सावंत, लेखक-दिग्दर्शक आणि गायक आनंद माडगूळकर, प्रख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे, इतिहास संशोधक अनुराधा कुलकर्णी आणि ग्रंथप्रसारक व ‌‘रुरल रिलेशन्स‌’चे प्रमुख प्रदीप लोखंडे यांचा सन्मान ना. चंद्रकांतदादाच्या हस्त्ो होणार आहे. या उपक्रमाचे हे चौथे वर्ष असून दि. 31 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड इथे होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी