July 27, 2026

-हरिनामाचा गजर करीत विद्यार्थ्यांनी केला पर्यावरणाचा आदरजाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे अनोखा पालखी सोहळा ; विविध गुणदर्शनातून उलगडली संतांची महती

0
IMG-20260726-WA0029
Spread the love

पुणे : प्लास्टिकला नकार, वारकऱ्यांचा निर्धार… कचरा टाका डब्यात, विठ्ठल राहील मनात… असे फलक पालखी सोहळ्यात हाती घेऊन हरिनामाचा गजर करीत विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा आदर केला. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या विद्यार्थ्यांनी मानाजीनगर नऱ्हे परिसरात पालखी सोहळा व विविध कार्यक्रमात सहभाग घेत जनजागृती देखील केली.

नऱ्हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांनी पालखी सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेतला. संस्थेच्या खजिनदार सुरेखा जाधवर यांच्या हस्ते पालखी पूजन व आरती करण्यात आली. तसेच संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

संस्थेच्या सभागृहात यानिमित्ताने आयोजित केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमात नदी जोड प्रकल्प, झाडे लावा झाडे जगवा, पाणी आडवा पाणी जिरवा याविषयी देखील जागृती करण्यात आली. तसेच विविध संतांच्या कथा नृत्याद्वारे उपस्थितांसमोर उलगडण्यात आल्या. यावेळी विद्यार्थी पारंपरिक वेशात सहभागी झाले होते.

  • फोटो ओळ : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या विद्यार्थ्यांनी मानाजीनगर नऱ्हे परिसरात पालखी सोहळा व विविध कार्यक्रमात सहभाग घेत जनजागृती केली. यावेळी सादरीकरण करताना विद्यार्थी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी