ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून डॉ. कुमार सप्तर्षी यांना श्रद्धांजली
अभ्यासू, संवेदनशील आणि निडर आवाज हरपला – ना. चंद्रकांतदादा पाटील
ज्येष्ठ समाजवादी नेते, गांधीवादी विचारवंत आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरुडचे आमदार ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन डॉ. सप्तर्षी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांनी सप्तर्षी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
“डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनामुळे समाजमनाला दिशा देणारा एक अभ्यासू, संवेदनशील आणि निडर आवाज हरपला आहे. त्यांनी संपूर्ण आयुष्यभर समाजवादी विचारांची प्रामाणिकपणे जोपासना केली. त्यांच्या कार्याचा ठसा अनेक पिढ्यांवर कायम राहील. त्यांच्या कुटुंबीयांच्या तसेच असंख्य अनुयायांच्या दुःखात मी सहभागी असून, दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दांत ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
