July 16, 2026

नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालया तर्फे ५८व्या वर्धापन दिनानिमित्त १६ जुलै २०२६ रोजी ‘स्कॉलर ऑफ द ईयर अवॉर्ड’ समारंभाचे आयोजन

0
IMG-20260716-WA0029
Spread the love

पुणे – मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालय येत्या १६ जुलै २०२६ रोजी ५८ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे त्या निमित्याने महाविद्यालयामध्ये दुपारी १२.३० पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ‘स्कॉलर ऑफ द ईयर’ पुरस्कार संध्याकाळी चार वाजता टाटा असेंब्ली हॉल मध्ये देण्यात येणार असल्याची माहिती नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वृषाली रणधीर यांनी पत्रकार परिषदेत दिली त्याच बरोबर इंडिया टुडे च्या सर्वेक्षणानुसार नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालय पुण्यात पहिले आणि भारतात दुसऱ्या क्रमांकावर आल्याचे सांगितले. या वेळी उपप्राचार्य डॉ महेंद्र आगळे,अमोल गायकवाड, प्रा. डॉ.लक्ष्मण बैसाणे,लक्ष्मण गावडे उपस्थित होते.

प्रा.डॉ. वृषाली रणधीर म्हणाल्या, वर्धापन दिना निमित्त्य यंदा महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स (MTPO) चे अध्यक्ष तसेच पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (PCET)-मूलन समूह, पुणे येथील उद्योग-संस्था संवाद व केंद्रीय प्रशिक्षण व प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शितलकुमार रावंडले यांचे “विद्यार्थ्यांच्या रोजगार संधी – प्राध्यापकांची भूमिका” या विषयावरील व्याख्यान दुपारी 12.30 वाजता महाविद्यालयातील नेव्हील वाडीया हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

माध्यम समन्वयक,
प्रशांत निकम
करुणा पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी