July 10, 2026

“वारकऱ्यांच्या सेवेत Esvee Team ची विठ्ठलभक्ती” — विजय वाघमारे व शिल्पा जयमनी यांच्या नेतृत्वाखाली अनोखा सेवायज्ञ

0
IMG-20260710-WA0151
Spread the love

पुणे : आषाढी वारी ही केवळ परंपरा नसून भक्ती, समर्पण आणि माणुसकीचा उत्सव आहे. याच सेवाभावातून Esvee Hair Studio & Academy चे संस्थापक विजय वाघमारे व शिल्पा जयमनी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण Esvee Team ने वारकरी बांधवांसाठी हृदयस्पर्शी सेवा उपक्रम राबविला.

एरंडवणे येथील श्रीमती अनुसयाबाई खिलारे मॉडेल स्कूल येथे संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम माऊली यांच्या दिंडींचा मुक्काम असताना, तेथे आलेल्या हजारो वारकऱ्यांसाठी मोफत हेअर कट, दाढी सेवा, फूट मसाज तसेच यंदा प्रथमच फुल बॉडी मसाज या विशेष सेवेचे आयोजन करण्यात आले.

अनेक किलोमीटरचा पायी प्रवास करून आलेल्या वारकऱ्यांचे थकलेले पाय, श्रमाने दमलेले शरीर आणि चेहऱ्यावरचा थकवा दूर करण्यासाठी Esvee Team चे सदस्य दिवसभर सेवेत तत्पर होते. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा उमटलेले समाधानाचे हास्य आणि त्यांच्या डोळ्यांतील कृतज्ञतेचे भाव हेच या सेवाकार्यातील सर्वात मोठे यश ठरले.

विजय वाघमारे आणि शिल्पा जयमनी हे गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता वारकऱ्यांची सेवा करत आहेत. “व्यवसायाबरोबर समाजसेवाही तितकीच महत्त्वाची” या विचारातून सुरू झालेला हा उपक्रम आज अनेकांसाठी प्रेरणास्थान बनला आहे.

यंदा प्रथमच सुरू करण्यात आलेल्या फुल बॉडी मसाज सेवेने वारकऱ्यांना विशेष दिलासा मिळाला. अनेक वारकऱ्यांनी “ही सेवा म्हणजे साक्षात विठ्ठलाची कृपाच” अशा भावना व्यक्त करत Esvee Team चे मनापासून आभार मानले.

“वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा” या भावनेने प्रेरित होऊन कार्य करणारे Esvee Hair Studio & Academy, संस्थापक विजय वाघमारे, शिल्पा जयमनी आणि संपूर्ण Esvee Team यांनी माणुसकी, सेवाभाव आणि विठ्ठलभक्तीचा एक सुंदर आदर्श समाजासमोर उभा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी