June 25, 2026

डायनॅमिक भारत २०४७ : श्री. निलेश ओक यांचे व्याख्यान २८ जून रोजी

0
IMG-20260625-WA0022
Spread the love

पुणे : भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास आणि त्यातून भविष्यातील भारताची दिशा याविषयी मार्गदर्शन करणारे “डायनॅमिक भारत २०४७” हे विशेष व्याख्यान रविवारी, २८ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता कर्वेनगर येथील पंडित फार्म्स, डी.पी. रोड येथे आयोजित करण्यात आले आहे. नागरिक सोशल फाउंडेशन आणि ॲम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात प्राचीन इतिहासाचे अभ्यासक व संशोधक निलेश ओक मार्गदर्शन करणार आहेत. रामायण आणि महाभारत ही केवळ महाकाव्ये किंवा काल्पनिक कथा नसून ती भारतीय इतिहासाच्या प्रदीर्घ परंपरेचा भाग असल्याचा दृष्टिकोन मांडत, इतिहासाचे चिंतन वर्तमान आणि भविष्य घडविण्यासाठी कसे उपयुक्त ठरू शकते यावर ते भाष्य करणार आहेत.

भारताच्या हजारो वर्षांच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाच्या आधारावर २०४७ पर्यंत देशाला अधिक वैभवशाली बनविण्याच्या संकल्पनेवर या व्याख्यानात चर्चा होणार आहे. तसेच इतिहासातील विविध संदर्भांमधील विज्ञान, ज्ञानपरंपरा आणि तत्कालीन तांत्रिक प्रगती याविषयीही माहिती दिली जाणार आहे.

विशेषतः युवकांनी आपल्या इतिहासाकडे आत्मविश्वासाने पाहून राष्ट्रनिर्मितीत सक्रिय योगदान द्यावे, हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी