दिव्यांच्या लखलखाटात उजळले श्री महालक्ष्मी मंदिरसारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात अधिक मासानिमित्त दीप उत्सव
पुणे : समई, पणत्या, फिरते दिवे आणि विविध प्रकारच्या दिव्यांनी श्री महालक्ष्मी मंदिराचा परिसर उजळून निघाला. पुरुषोत्तम मासानिमित्त मंदिरात दीप उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी फुलांची आकर्षक रंगावली देखील काढण्यात आली होती.
सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात अधिक महिन्यात दीप उत्सव साजरा करण्यात आला. ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांसह विश्वस्त मंडळाने उपक्रमांचे संयोजन केले आहे.
यावेळी पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले, विश्वस्त प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर यांसह पदाधिकारी व मंदिराचे कार्यकर्ते उपस्थित होते.
- फोटो ओळ : श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे अधिक मास निमित्त मंदिरात महिनाभर विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मंदिरात दीप उत्सव साजरा करण्यात आला.
