August 2, 2026

स.प.महाविद्यालयाची भाविका भारतीय क्रिकेट संघाची कर्णधारशि.प्र. मंडळी तर्फे सन्मान ; महाविद्यालयाकरिता गौरवाचा क्षण

0
IMG-20260614-WA0019
Spread the love


पुणे : सर परशुरामभाऊ महाविद्यालयाची इयत्ता १२ वी ची विद्यार्थिनी भाविका अहिरे हिची १९ वर्षांखालील भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार म्हणून निवड झाली. भाविका बंगळुरू येथील क्रिकेट अकादमीमधे रुजू होऊन येत्या श्रीलंका संघासोबत होणाऱ्या दौऱ्यामधे भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

महाविद्यालयात भाविका हिचा सत्कार शि.प्र. मंडळीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राधेश्याम अग्रवाल यांनी केला. यावेळी भाविकाचे वडील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील, उपप्राचार्य दिनेश सूर्यवंशी, परिवारातील सदस्य, क्रिडाशिक्षक व प्राध्यापक उपस्थित होते.

उच्च प्रतीच्या क्रीडाक्षेत्राची परंपरा असलेल्या स.प महाविद्यालयाकरीता व पुणे शहराकरीता देखील हा एक अत्यंत गौरवाचा क्षण आहे, असे उद्गार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील यांनी काढले. याप्रसंगी शि.प्र. मंडळीद्वारे येत्या काळात नवे क्रीडा धोरण बनवून क्रीडा विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहाय्य व प्रोत्साहन देण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

भाविकाच्या या यशाबद्दल शि.प्र.मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष सुधीर काळकर, सदस्य तुषार कुलकर्णी, पराग ठाकुर यांच्यासह इतर सर्व सदस्य तसेच महाविद्यालयाचे सर्व उप प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी