June 9, 2026

विविध पुरस्कार सन्मान सोहळा संपन्न….

0
IMG-20260609-WA0002
Spread the love



आज दिनांक 8 जून 2026 रोजी सालाबाद प्रमाणे स्मिता वाल्हेकर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध कला, क्रीडा,उद्योजक व सामाजिक क्षेत्रातील नामवंत विद्यार्थी, विद्यार्थिनी व ज्येष्ठ प्रशिक्षक तसेच समाज सेवक यांना पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जगन्नाथ लकडे यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, येरवडा पुणे येथे विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले…ज्यामध्ये बॉऊंडलेस स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष, लतेंद्र भिंगारे सर यांना कराटे क्षेत्रातील “जीवन गौरव पुरस्कार “प्रदान करण्यात आला तसेच अरविंद थोरात सर , शुभम रणदिवे सर, नितेश गौड सर यांना “उत्कृष्ट कराटे प्रशिक्षक म्हणून पुरस्कार “देण्यात आला….या प्रसंगी श्री. जगन्नाथ लकडे यांनी उपस्थित सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून भावी कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या…आणि त्यांनी आपल्या मनोगतात “आज दुर्दैवाने पुणे शहर व ग्रामीण भागातील मुला मुलींची संख्या पाहता क्रीडा मैदानांवर खूपच कमी प्रमाणात मुला मुलींची संख्या दिसते…याचे कारण प्रत्येकाच्या हातातील मोबाईल झाले आहे या मोबाईल मुळे आजचे अल्प वयीन मुले ,मुली व तरुणाई शिक्षणापासून तसेच कला क्रीडा क्षेत्रापासून भरकटत चालली आहे…याला कुठेतरी आळा घालणं ही काळाची गरज आहे यासाठी आई,वडील,शालेय शिक्षक व सर्व क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजे…. अन्यथा पुढील पिढी ही आणखीनच मोबाईलच्या आहारी जाऊन व्यसनाधीन व गुन्हेगारी प्रवृत्तीत आपले आयुष्य उध्वस्त करून घेईल….. खऱ्या अर्थाने देशातील सर्व मुला मुलींनी क्रीडा क्षेत्राकडे अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे,आपली शरीरयष्टी जपली पाहिजे , व्यसनापासून दूर राहून इतरांचे आदर्श म्हणून जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे…. असे अनमोल मार्गदर्शन केले यावेळी स्मिता वाल्हेकर स्पोर्ट्स फाउंडेशनचे प्रमुख माननिय भरत वाल्हेकर यांनीही पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले….या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन श्री.सुनील साठे यांनी केले…. कळावे,आपले, लतेंद्र भिंगारे सर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी