July 13, 2026

-कला हे आनंदाच्या अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम

0
IMG-20260608-WA0025
Spread the love

डॉ. दिलीप शेठ यांचे मत : शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी तर्फे कै. शाहीररत्न किसनराव हिंगे यांच्या २८ व्या स्मृतिदिन समारोहानिमित्त ‘शाहिरी निनाद’ अंकाचे प्रकाशन व पोवाडा प्रशिक्षण वर्ग समारोप कार्यक्रम

पुणे : आनंदाचा शोध बाहेर नव्हे तर स्वतःमध्ये घ्यावा. कला ही त्या आनंदाच्या अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम असून शिस्तीमुळे व्यक्तिमत्त्वाला योग्य पैलू पडतात. शाहीरी कला ही व्यक्तिमत्त्व घडवणारी आणि शिस्त शिकवणारी देखील असल्याने तिचे जतन व संवर्धन होणे आवश्यक आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक अध्यासनाचे प्रमुख डॉ. दिलीप शेठ यांनी व्यक्त केले.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी तर्फे कै. शाहीररत्न किसनराव हिंगे यांच्या २८ व्या स्मृतिदिन समारोहानिमित्त ‘शाहिरी निनाद’ अंकाचे प्रकाशन व पोवाडा प्रशिक्षण वर्ग समारोप कार्यक्रम डेक्कन येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला. यावेळी आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमात शाहीर हिंगे यांचे सहकारी पराग ठाकूर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच क्रांतिसूर्य शाहीर महात्मा जोतिबा फुले यांच्या जन्म द्विशताब्दी निमित्त ‘शाहिरी निनाद’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी लातूरचे शाहीर संतोष साळुंखे आणि सहकारी यांचा ‘नमन तुज शाहीरा’ हा शाहिरी कार्यक्रम झाला.

शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, परंपरा जपण्यासाठी ही कला आम्ही पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम करीत आहोत. परंतु दरवर्षी दहावीच्या मुलांना कलाशिक्षणासाठी १० मार्क देण्यासाठी प्रबोधिनीकडून शिफारस पत्र दिले जाते. परंतु शाळेकडून वेळेवर त्याकडे लक्ष दिले जात नाही आणि त्यामुळे बोर्डाकडून देखील अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रबोधिनीत शिक्षण घेणाऱ्या मुलांचे नुकसान होत आहे. याकडे शासनाच्या प्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अक्षदा इनामदार हिने सूत्रसंचालन केले. होनराज मावळे यांनी प्रास्ताविक केले. प्रीती यादव- खोसे यांनी आभार मानले.

फोटो ओळ – शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी तर्फे कै. शाहीररत्न किसनराव हिंगे यांच्या २८ व्या स्मृतिदिन समारोहानिमित्त ‘शाहिरी निनाद’ अंकाचे प्रकाशन व पोवाडा प्रशिक्षण वर्ग समारोप कार्यक्रम डेक्कन येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला. यावेळी शाहीर हिंगे यांचे सहकारी पराग ठाकूर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी