ओबेन इलेक्ट्रिकच्या महाराष्ट्र विस्ताराला वाढती मागणी; आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत २५ शोरूमचे लक्ष्य
• महाराष्ट्रातील एकूण Rorr Evo विक्रीपैकी सुमारे २५ टक्के विक्री पुण्यातून होण्याचा अंदाज, राज्यातील रिटेल नेटवर्क विस्तारावर भर
• नव्याने लाँच झालेल्या Oben Rorr Evo ला दमदार प्रतिसाद; लाँचनंतर अवघ्या १५ दिवसांत २५ हजार बुकिंग्स
• Rorr Evo ची डिलिव्हरी जून २०२६ पासून सुरू होणार; ग्राहकांना ऑनलाइन पेमेंट पोर्टलद्वारे अद्याप ₹९९,९९९ (एक्स-शोरूम) या प्रारंभिक किमतीचा लाभ
पुणे, २६ मे २०२६ : या भारतातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या संशोधन व विकास (R&D) आधारित इलेक्ट्रिक मोटरसायकल उत्पादक कंपनीने महाराष्ट्रातील विस्ताराला गती दिली आहे. कंपनीच्या नव्या Rorr Evoमोटरसायकलला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला असून, लाँचनंतर अवघ्या १५ दिवसांत २५ हजार बुकिंग झाल्या आहेत. यी पार्श्वभूमीवर कंपनीने आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत महाराष्ट्रात २५ शोरूम सुरू करण्याची योजना आखली आहे. यामुळे ग्राहकांना इलेक्ट्रिक मोटरसायकल, सेवा सुविधा मिळणार आहेत.
कंपनीने पुण्यातील शिवाजीनगर शोरूममध्ये Rorr Evo चे महाराष्ट्रासाठी प्रादेशिक सादरीकरण केले. पुणे हे कंपनीसाठी देशातील सर्वाधिक प्रतिसाद देणाऱ्या बाजारपेठांपैकी एक असल्याचे कंपनीने नमूद केले. सध्या ओबेन इलेक्ट्रिकची महाराष्ट्रात ११ शोरूम्स कार्यरत असून, त्यापैकी पुण्यात वाकड, शिवाजीनगर, अरण्येश्वर आणि चिंचवड येथे चार शोरूम्स आहेत. याशिवाय छत्रपती संभाजीनगर, नाशिक, लातूर, नागपूर, बार्शी, सोलापूर आणि अहमदपूर येथेही आउटलेट्स आहेत.
कंपनी आर्थिक वर्ष २०२७ अखेरपर्यंत महाराष्ट्रात आणखी १४ नवीन शोरूम्स सुरू करणार आहे. उच्च कार्यक्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटरसायकल्सची वाढती मागणी आणि वेगाने होणारा ईव्ही स्वीकार यामुळे हा विस्तार केला जात आहे. महाराष्ट्रातील एकूण Rorr Evo विक्रीपैकी जवळपास २५ टक्के विक्री पुण्यातून होईल, असा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे.
नव्या Rorr Evo ला मिळालेला प्रतिसाद हा भारतातील इलेक्ट्रिक मोटरसायकल क्षेत्रातील सर्वात वेगवान सुरुवातीच्या बुकिंग्सपैकी एक मानला जात आहे. या मोटरसायकलची डिलिव्हरी जून २०२६ पासून सुरू होणार असून ग्राहकांना अद्याप ऑनलाइन पेमेंट पोर्टलद्वारे ₹९९,९९९ (एक्स-शोरूम) या प्रारंभिक किमतीचा लाभ घेता येणार आहे.
कंपनीच्या विस्ताराबाबत बोलताना मधुमिता अगरवाल म्हणाल्या, “महाराष्ट्र प्रीमियम इलेक्ट्रिक मोटरसायकल्ससाठी अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ म्हणून उदयास आले आहे. ग्राहकांमध्ये वाढती जागरूकता, ईव्ही स्वीकार आणि उच्च कार्यक्षमतेच्या मोबिलिटी सोल्यूशन्सची वाढती पसंती यामुळे हा बदल होत आहे. Oben Rorr Evo ला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक असून बाजारातील दीर्घकालीन वाढीबाबत आमचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे. पुण्यावर विशेष लक्ष केंद्रित करत महाराष्ट्रातील विस्ताराद्वारे आम्ही उच्च कार्यक्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटरसायकल्स अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवू इच्छितो. तसेच शहरी आणि उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये मजबूत सेवा आणि मालकी नेटवर्क उभारून दीर्घकालीन ईव्ही स्वीकाराला चालना देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
पहिल्या १० हजार ग्राहकांसाठी Rorr Evo ची प्रारंभिक किंमत ₹९९,९९९ (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली असून त्यानंतरची किंमत ₹१,२४,९९९ (एक्स-शोरूम) असेल. या मोटरसायकलमध्ये कंपनीची स्वतः विकसित केलेली IPMSM मोटर वापरण्यात आली असून ती ९ किलोवॉट पीक पॉवर निर्माण करते. ही मोटर दुर्मिळ धातूंशिवाय तयार करण्यात आली असून IP68 प्रमाणित आहे. तसेच ती मागील पिढीपेक्षा ४० टक्के अधिक कॉम्पॅक्ट आणि २० टक्के अधिक शक्तिशाली असून २५० Nm व्हील टॉर्क निर्माण करते.
Rorr Evo मध्ये ३.४ kWh LFP बॅटरी देण्यात आली असून ती IDC प्रमाणित १८० किमी रेंज देते. ही मोटरसायकल ० ते ४० किमी प्रतितास वेग फक्त ३ सेकंदांत गाठते आणि तिचा टॉप स्पीड ११० किमी प्रतितासआहे. फास्ट चार्जिंग सुविधेमुळे बॅटरी ० ते ८० टक्के फक्त ९० मिनिटांत चार्ज होते. कंपनीकडून बॅटरीवर ८ वर्षांची वॉरंटी दिली जात आहे.
या मोटरसायकलमध्ये विभागातील सर्वात लांब सीट आणि १० लिटर स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. याशिवाय SmartIQ™ या AI-आधारित तंत्रज्ञानाद्वारे रेंज कार्यक्षमतेत १५ टक्क्यांपर्यंत वाढ होते. मोटरसायकलमध्ये ५-इंच कलर TFT डिस्प्ले, OTA अपडेट्स, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, जिओ-फेन्सिंग, रिमोट इमोबिलायझेशन आणि आपत्कालीन SOS सुविधांसह कंपनीचे ARGUS कनेक्टेड टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मदेण्यात आले आहे.
देशभरातील विस्ताराला पाठबळ देण्यासाठी ओबेन इलेक्ट्रिककडे सध्या १८ राज्यांतील १०० हून अधिक शहरांमध्ये १५० पेक्षा अधिक शोरूम्स आणि सेवा केंद्रांचे नेटवर्क आहे. आर्थिक वर्ष २०२७ अखेरपर्यंत कंपनी देशभरात आणखी २०० विशेष शोरूम्स सुरू करण्याच्या तयारीत आहे.
बेंगरूळूमधील कंपनीच्या उत्पादन प्रकल्पाची वार्षिक क्षमता १ लाख मोटरसायकल्स इतकी आहे. ओबेन इलेक्ट्रिक बॅटरी, मोटर्स, व्हेईकल कंट्रोल युनिट्स (VCU), चार्जर्स आणि सॉफ्टवेअर प्रणाली यांसह महत्त्वाचे सर्व ईव्ही घटक स्वतः विकसित आणि तयार करते. प्रत्येक आउटलेटला स्वतंत्र सेवा केंद्राची जोड देण्यात आली असून कंपनीचा ९१ टक्के ग्राहक समाधान (CSAT) स्कोअर असल्याचा दावा करण्यात आला आहे.
ओबेन इलेक्ट्रिकबद्दल
२०२० मध्ये स्थापन झालेली ओबेन इलेक्ट्रिक ही संशोधन व विकासावर आधारित इलेक्ट्रिक मोटरसायकल कंपनी आहे. कंपनी बंगळुरूमधील ३.५ एकर उत्पादन प्रकल्पातून कामकाज करते. भारतात डिझाइन आणि उत्पादन करण्याच्या दृष्टीकोनातून कंपनी इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करत आहे.
LFP बॅटरी तंत्रज्ञानाचा इलेक्ट्रिक दुचाकींमध्ये वापर करणाऱ्या अग्रगण्य कंपन्यांपैकी ओबेन इलेक्ट्रिक एक आहे. कंपनीकडे स्वतःच्या तंत्रज्ञान आणि ईव्ही घटकांशी संबंधित २५ हून अधिक पेटंट्स आहेत. भारतातील इलेक्ट्रिक मोटरसायकल बाजारपेठेत आघाडी घेण्याचे आणि जागतिक स्तरावर सर्वात मोठी इलेक्ट्रिक मोटरसायकल उत्पादक कंपनी बनण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
