May 14, 2026

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शिवकालीन भव्य शस्त्र प्रदर्शन व “महाराष्ट्राची गौरवगाथा” सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

0
IMG-20260514-WA0024
Spread the love
  • शिवकालीन शस्त्र प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे :धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६९ व्या जयंतीनिमित्त फडके हौद चौक, कसबा पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आलेले शिवकालीन भव्य शस्त्र प्रदर्शन तसेच “महाराष्ट्राची गौरवगाथा” हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या भव्य प्रदर्शनामध्ये दांडपट्टा, धोप तलवार, तलवारीचे विविध प्रकार, बिछूवा, कट्यार, वाघनख, खंजीर, चिलखत तसेच भाले यांसारख्या शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रांचे आकर्षक प्रदर्शन करण्यात आले होते. मराठा साम्राज्याचा इतिहास, युद्धकौशल्य आणि शिवकालीन परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या या प्रदर्शनाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. इतिहासप्रेमी, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवकालीन वारशाविषयी माहिती जाणून घेतली.

यावेळी सादर करण्यात आलेल्या “महाराष्ट्राची गौरवगाथा” या सांस्कृतिक कार्यक्रमातून महाराष्ट्राचा इतिहास, पराक्रम आणि सांस्कृतिक वैभव प्रभावीपणे उलगडण्यात आले. विविध कलावंतांच्या दमदार सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. अफजल खान वध, देवीचा गोंधळ,वाघ्या मुरळी,महाराष्ट्र गीत,पोवाडे, गण, गवळण, अभंग,शेतकरी,वासुदेव, नृत्याविष्कार तसेच ऐतिहासिक प्रसंगांच्या प्रभावी सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर शिवमय वातावरणाने भारावून गेला होता.

कार्यक्रमादरम्यान करण्यात आलेल्या भव्य आतिषबाजीने वातावरण अधिक दिमाखदार व उत्साहपूर्ण झाले. आकर्षक आतिषबाजीमुळे उपस्थित नागरिकांनी जल्लोषात सहभाग नोंदवत कार्यक्रमाचा आनंद लुटला.

कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, इतिहासप्रेमी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी कार्यक्रमाचे तसेच शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाचे आयोजन श्री किशोर भगवान तरवडे व सौ. मेघना किशोर तरवडे यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक तसेच नागरिकांचे सहकार्य लाभल्याबद्दल आयोजकांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी