May 8, 2026

एमआयटी डब्ल्यूपीयूतपेंट व नेल पेंट निर्मितीवरील प्रात्यक्षिक कार्यशाळा संपन्न

0
IMG-20260506-WA0005
Spread the love

पुणे, ६ मेः विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराची नवी संधी उपलब्ध करुन देणे, औद्योगिक पॉलिमर केमिस्ट्री क्षेत्रात कौशल्य विकास, प्रात्यक्षिक अनुभव आणि उदयोजकता विकास यांना प्रोत्साहन देण्याच्या मुख्य उद्देशाने एमआयटी वर्ल्ड पीस युनव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटल स्टडीज अंतर्गत पेंट आणि नेल पेंट निर्मितीवर एक दिवसीय हँडस ऑन स्किल एन्हान्समेंट कार्यशाला यशस्वीपणे आयोजित करण्यात आली.
डब्ल्यूपीयूच्या रसायनशास्त्र विभागाने क्वॉलिटी पेंटस अँड कोटिंग्ज यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी उद्योग तज्ज्ञ डॉ. के. अतुल, डायरेक्टर मार्केटिंग सौद्या दीप्ती चंद्रचूड, क्वालिटी पेंटस अँड कोटिंग्जच्या अश्विनी काकडे व प्रा. नाना सातपुते हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच या कार्यशाळेचे संयोजन प्रा.डॉ. वसी शेख आणि सह संयोजक डॉ. वंदना मूस उपस्थित होते.
या कार्यशाळेत विविध शैक्षणिक संस्थांमधील ७०हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला होता. येथे विद्यार्थ्यांना डेकोरेटिव्ह पेंट आणि नेल पेंटच्या निर्मितीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. तसेच उत्पादन प्रक्रिया, फॉर्म्युलेशन आणि चाचणी पद्धतींबाबत उदयोगातील प्रत्यक्ष अनुभव मिळाला. या कार्यशाळेमुळे सौद्धांतिक ज्ञान आणि औद्योगिक उपयोग यामधील दरी कमी करण्यास मदत झाली.
सन्माननीय पाहुण्यानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन उदयोग क्षेत्रातील संधी आणि उद्योजकतेबाबत प्रेरित केले. हा उपक्रम एमआयटी डब्ल्यूपीयूच्या उदयोगाभिमुख शिक्षण, कौशल्य विकास आणि भावी उदयोजक घडविण्याच्या बांधिलकीचे दयोतक ठरले आहे.

जनसंपर्क विभाग,
एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी