May 2, 2026

वृद्धाश्रमातील ज्येष्ठांनाआधार कार्ड व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणार – ना. माधुरीताई मिसाळ.

0
IMG-20260502-WA0061
Spread the love

कुटुंबातील ज्येष्ठांना
वृद्धाश्रमात धाडणे हे कोणत्याही सुसंस्कृत शहराला शोभणारे नाही – संदीप खर्डेकर.

क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे विविध संस्थांना मदतीचा हात – सौ. मंजुश्री खर्डेकर.

वृद्धाश्रमातील ज्येष्ठाना तसेच दिव्यांगांना आधार कार्ड मिळणे सुलभ व्हावे व त्यायोगे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ना. माधुरीताई मिसाळ म्हणाल्या. केंद्र व राज्य सरकारच्या ज्येष्ठांसाठी अनेक कल्याणकारी योजना असून त्याचा लाभ केवळ निराधार ज्येष्ठानीच नव्हे तर सर्वच ज्येष्ठांनी घ्यावा असेही त्या म्हणाल्या.
क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने श्री स्वामीकृपा आशीर्वाद वृद्ध निवास,नवरत्न वृद्धाश्रम व स्वामीआंगण वृद्धाश्रमांना विविध उपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त व कर्वेनगर वारजे क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर, नवरत्न ओल्ड एज होमच्या अनिताताई राकडे,श्री स्वामीकृपा आशीर्वाद वृद्ध निवास चे विकास देडगे व आदित्य देडगे, स्वामीआंगण वृद्धाश्रम च्या आनंदी जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शासकीय योजनांचा लाभ घेताना आधार कार्ड ची गरज भासते मात्र ते सहज मिळत नसल्याने अडचणी येत आहेत अशी तक्रार केली असता “त्यावर त्वरित उपाययोजना करून अश्या गरजुंना आधार कार्ड सुलभतेने उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करेन असे ना. माधुरीताई मिसाळ म्हणाल्या.
क्रिएटिव्ह फाउंडेशन सातत्याने समाजातील गरजवंतांना मदतीचा हात देत असून “महाराष्ट्र दिनाच्या” शुभदिनी तीन वृद्धाश्रमांना उपयुक्त साहित्य भेट देत असल्याचे फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. निराधारांना वृद्धाश्रमाचा मोठा आधार आहे मात्र आता सुस्थितीतील कुटुंबात ज्येष्ठांची अडचण वाटते व त्यांना वृद्धाश्रमात धाडले जाते हे कोणत्याही सुसंस्कृत शहराला शोभणारे नाही असे मत ही संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे वॉटर बेड, एअर बेड, व्हीलचेयर, हिटिंग व कुलिंग पॅड, डायपर, हॅन्ड ग्लोवज व इतर उपयुक्त वस्तू भेट देताना आम्हांस समाजाप्रतीच्या दायित्वाची आपली जबाबदारी पूर्ण करत असल्याचे समाधान लाभते असे क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना अनिता राकडे व आनंदी जोशी म्हणाल्या की ” संदीप खर्डेकरांसारखे भाऊ आमच्या पाठीशी उभे राहतात आणि वेळोवेळी मदत करतात त्यामुळे आम्हाला वृद्धांचा सांभाळ करणे सोप्पं होतं, तसेच माधुरीताईसारख्या संवेदनशील राजकारणी पाठीशी असल्यामुळे हे सेवाकार्य आम्ही अखंड सुरू ठेऊ असेही अनिताताई राकडे व आनंदीताई जोशी म्हणाल्या.यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने ना. माधुरीताई मिसाळ यांचा सत्कार करण्यात आला.

आपला,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष – क्रिएटिव्ह फौंडेशन.
मो – 9850999995

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी