May 2, 2026

भगवान बुद्धांचा विचार विश्वकल्याणाचा विचार— केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले

0
IMG-20260502-WA0092
Spread the love

घाटकोपर मधील धम्मरत्न बुद्धविहारात बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना

मुंबई दिनांक 2 – महाकारुणी भगवान गौतम बुद्धांनी दिलेला बौद्ध धम्म हा अखिल मानवजातीसाठी आदर्श जीवनमार्ग आहे.सर्व जाती धर्माच्या लोकांना बुद्धविचार कळला आहे.भारतातच तर संपूर्ण विश्वात बुद्धविचार स्वीकारला जात आहे.भगवान बुद्धांनी मानवतेचा; विज्ञानवादी; अहिंसेचा विश्वशांतीचा; विश्वबंधुत्वाचा आणि विश्वकल्याणाचा विचार जगाला दिला आहे.भारतात स्थापन झालेला बौद्ध धम्म जगभर प्रसारित झाल्याचा आपल्याला अभिमान असल्याचा पाहिजे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.बुद्धपौर्णिमेच्या उत्सवानिमित घाटकोपर पश्चिम भीमनगर येथे dhammrtan बुद्धविहार येथे महाकारुणी भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची स्थापना केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आली.त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत ना.रामदास आठवले बोलत होते.

यावेळी जयभवानी विकास मंडळाच्या वतीने आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीने केंद्रिय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचा भव्य सत्कार करण्यात आला.सलग तीनवेळा बिनविरोध राज्यसभेत निवडून आल्याबद्दल ना. रामदास आठवले यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि भव्य पुष्पहार देऊन ना. रामदास आठवले यांचा भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी माजी आमदार वीरेंद्र बक्षी रिपाइं चे मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड; अल्पसंख्यांक आघाडी मुंबई अध्यक्ष सोहेल शेख; जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव; रिपब्लिकन पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे; देवेंद्र रणपिसे; मनोज रणपिसे; तसेच जयभवानी विकास मंडळाचे डॉ.निलेश बनसोडे; मनोज घोडेस्वार ; सुमिता मधुकर शिंदे; मयुर चाबुकस्वार; उमेश गायकवाड ; हितेश जगताप रिपाइं चे विजय वंजारी अमीना खान बौद्धचार्य साहेबराव गायकवाड आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ बळवंत सिंह यांच्या बुद्धमुद्रा या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाश ही ना. रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.
जगात भगवान बुद्धांचे ; महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव गाजत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे सर्व जाती धर्मासाठी आहे.एका धर्माने दुसऱ्या धर्माचा सन्मान केला पाहिजे .कोणीही कुणाच्या धार्मिक भावना दुखावू नयेत.एकमेकांच्या धर्माचा सन्मान करुन एकमेकांच्या धार्मिक उत्सवात सामील झाले पाहिजे.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा आणि जनतेच मला आशीर्वाद आहे.तुमचा मला आशीर्वाद नसता तर केंद्रात मंत्री पदापर्यंत पोहोचू शकलो नसतो.एकच लक्ष एकच पक्ष रिपब्लिकन पक्ष आणि सत्ता मिळविण्याकडे ठेवा लक्ष असे सांगत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष मी देशभर वाढवत आहे.तुम्ही ही रिपब्लिकन पक्ष वाढविण्याचा निर्धार करा असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.

              हेमंत रणपिसे 
              प्रसिद्धी प्रमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी