June 21, 2026

दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या पालकत्व योजनेतील 12 वी च्या विद्यार्थ्यांचा 100 टक्के निकाल

0
IMG-20260502-WA0093
Spread the love

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे संचलित जय गणेश ज्ञानवर्धन अभियान अंतर्गत जय गणेश विद्यार्थी पालक योजनेमधील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.

83.17% गुण मिळवून कॉमर्स विभागातून श्रुतिका होडे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच 81.17% गुण मिळवून समृद्धी शिंदे या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक मिळवला.

श्रुतिका होडे हिला चार्टर्ड अकाउंटंट होण्याची इच्छा आहे.
तर समृद्धी शिंदेला Data alaylist मध्ये करिअर करायच आहे.
तर सायन्स विभागात प्रथम आलेल्या आर्यन काशीद यांनी देखील आपले ट्रस्ट विषयी आपले मनोगत व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या पालकत्व योजनेचा अत्यंत मोलाचा लाभ झाला अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

त्यासाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सर्व विश्वस्तांनी केलेल्या मार्गदर्शना प्रित्यर्थ मनापासून आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी