May 2, 2026

व्यवसायात मूल्यांचे निर्विवाद महत्त्व : रमेश अग्रवालपुणे ब्रदरहुड फाउंडेशनच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा संपन्न

0
IMG-20260430-WA0017
Spread the love

पुणे : व्यवसायात तसेच एकूण जीवनातही मूल्यांचे महत्त्व निर्विवाद आहे. मूल्यांचे पालन व्यक्तीला अपार शक्ती प्रदान करते, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मूल्यांशी तडजोड करता कामा नये, असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक व वायुसेनेचे निवृत्त अधिकारी रमेश अग्रवाल यांनी केले.

पुणे ब्रदरहुड फाउंडेशनच्या नव्या कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी उद्योजक नरेंद्र गोयल यांनी माजी अध्यक्ष सागर अग्रवाल यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.

या कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष ईश्वरचंद गोयल, कार्यकारी संचालक पवन बंसल, संजय अग्रवाल, सेवा भारती पश्चिम महाराष्ट्रचे कोषाध्यक्ष सुधीर जावळेकर, द्वारका जालान, जीतो एपेक्सचे अध्यक्ष विजय भंडारी, मनोज छाजेड, सीए जितेश अग्रवाल, रूची गोयल, गीता गोयल, कांता गोयल, रामशरण गुप्ता, प्रेमचंद मित्तल, जय भगवान गोयल यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

रमेश अग्रवाल म्हणाले की, प्रत्येक उद्योजक आपल्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी एक ठराविक दृष्टीकोन ठेवतो आणि त्यानुसार कार्यपद्धती ठरवतो. त्याचप्रमाणे व्यवसाय करताना मूल्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. व्यवसायात मूल्यांचा पाया नसेल, तर त्या दृष्टीकोनालाच धक्का बसू शकतो.

कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की, कोणत्याही व्यवसायाच्या यशामध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यांना केवळ कर्मचारी म्हणून नव्हे, तर सहकारी म्हणून वागणूक द्यावी. त्यांना कुटुंबाचा भाग मानल्यास त्यांच्यात आपलेपणा निर्माण होतो आणि ते प्रत्येक परिस्थितीत ठामपणे सोबत उभे राहतात.

ते पुढे म्हणाले की, “शंभर मूर्तींची पूजा करण्यापेक्षा शंभर हातांना कौशल्य देणे अधिक महत्त्वाचे आहे.” कुशल हात स्वतःच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या आणि राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठे योगदान देतात.

नवीन अध्यक्ष नरेंद्र गोयल यांनी सांगितले की, पुणे ब्रदरहुड फाउंडेशनने गेल्या २७ वर्षांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. या मंचाच्या माध्यमातून समाजातील लोकांना वैयक्तिक व व्यावसायिक नातेसंबंध विकसित करण्याची संधी मिळते. त्यांनी आपल्या कार्यकाळात कार्यक्रमांची संख्या वाढविणे, सदस्यांचा सहभाग वाढविणे, महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे आणि नव्या पिढीला संस्थेशी जोडण्याचा संकल्प व्यक्त केला.

नवी कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
नरेंद्र गोयल (अध्यक्ष), अरविंद अग्रवाल (सचिव), संदीप पी. अग्रवाल – सीए (कोषाध्यक्ष), योगेश जैन (संयुक्त सचिव), सागर अग्रवाल (आयपीपी), संजय बी. अग्रवाल (उपाध्यक्ष), मुकेश कानोडिया (उपाध्यक्ष–१), संजय बंसल, अरुण कुमार सिंघल, राकेश अग्रवाल, प्रशांत अग्रवाल, जितेंद्र बंसल, राजेश एस. मित्तल, शैलेश अग्रवाल, अजय जिंदल, अनूप गर्ग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी