-ऐतिहासिक वेशभूषा, वक्तृत्व व पारंपरिक नृत्य स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसादप्रभात मित्र मंडळाचा शिवजयंती महोत्सव उत्साहात
पुणे – गुरुवार पेठेतील प्रभात मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित सार्वजनिक शिवजयंती महोत्सव २०२६ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील लहान मुलांच्या कला-गुणांना वाव मिळावा, या उद्देशाने ऐतिहासिक वेशभूषा, वक्तृत्व तसेच पारंपरिक नृत्य स्पर्धांचे आयोजन कृष्णहट्टी चौक, गुरुवार पेठ येथे करण्यात आले होते.
या उपक्रमाला मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूण ८४ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धा छोटा, मध्यम व मोठा अशा तीन गटांत घेण्यात आल्या. स्पर्धेचे परीक्षण डॉ. कविता घिया व संगीता शाह यांनी केले. कार्यक्रमास श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष मंगेश राव, पै. भरत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते तसेच मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
ऐतिहासिक वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धेत छोट्या गटात वेदश्री दोडला प्रथम, शिवाज्ञा कोंढरे द्वितीय व अनुज पाटणे याने तृतीय क्रमांक पटकावला. मध्यम गटात श्रावण घोलप, शिवांश जाधव व सक्षम वर्धेकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. मोठ्या गटात सृष्टी घोटणे, शौर्य टेकवडे व मनस्वी दोडला यांनी यश मिळविले.
पारंपरिक नृत्य स्पर्धेत छोट्या गटात देवांशी परदेशी प्रथम, आरोही तांबे द्वितीय व पूर्वा शिळीमकर तृतीय विजेती ठरली. मोठ्या गटात यशराज गंजकर प्रथम, सृष्टी घोटणे द्वितीय व स्वरा परदेशी तृतीय तर सामूहिक गटात अनुष्का कोंढाळकर, काव्या धिडे,माही वाघमोडे, आराध्या बलवार व राजवी गिरे यांचा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. तर जागृती यांदे, आराध्या बोडके द्वितीय, वेदश्री दोडला, अनुज पाटणे हे तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमोल थोरात, हेमराज साळुंके, शुभश्री चिल्लाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
