May 16, 2026

रोबोटिक प्रणालीच्या साहाय्याने सांधेरोपण शस्त्रक्रियांसाठी आर्कस हॉस्पिटल पुणे येथे सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन· शल्यचिकित्सकांच्या प्रशिक्षणासाठी आर्कस हॉस्पिटल आणि स्ट्रायकर यांच्यात सहयोग

0
sanvidhan_news_150x150
Spread the love

पुणे,26 फेब्रुवारी 2026 : ऑर्थोपेडिक उपचारांसाठी प्रख्यात असलेल्या पुण्यातील आर्कस हॉस्पिटल ने मेडिकल तंत्रज्ञानातील आघाडीच्या जागतिक कंपनी असलेल्या स्ट्रायकरशी सहयोग केला असून याअंतर्गत शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.या सहयोगाअंतर्गत भारत आणि भारताबाहेरच्या शल्यचिकित्सकांच्या प्रशिक्षणासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापित करण्यात आले असून स्नायूंचे नुकसान न करणारे तंत्र वापरून रूग्ण लवकर बरा होण्याच्या दिशेने फायदेशीर असलेल्या डायरेक्ट अँटिरियर ॲप्रोच (डीएए) या तंत्रावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

हे तंत्र आर्कस हॉस्पिटलचे संचालक डॉ.रोहित लुथ्रा यांनी प्रथम 2018 साली वापरले होते.डॉ.रोहित लुथ्रा यांनी भारतात सर्वाधिक बायलॅटरल रोबोटिक टोटल हिप रिप्लेसमेंट प्रक्रिया करत भारतातील सांधेरोपण क्षेत्रात परिवर्तन आणले आहे.डॉ.लुथ्रा हे टेड स्पीकर असून वेदना विरहित प्रक्रिया हे त्यांचे ध्येय आहे.त्यांचे ट्रेडमार्क ट्रुरोबोटिक्स व मॅक प्रिसिजन तंत्र हे शल्यचिकित्सा कौशल्य आणि रोबोटिक्सचा मिलाफ असून यामुळे रूग्णांना चांगले परिणाम मिळतात आणि शस्त्रक्रियानंतर काही तासातच हालचाल सुरू करता येते.

रोबोटिक हिप आर्थोप्लास्टीसाठी भारतातील सर्वाधिक प्रमाणात असलेल्या केंद्रांपैकी एक म्हणून आर्कस हॉस्पिटल नवीन वैद्यकीय मापदंड स्थापित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे.या भागीदारीचे उद्दिष्ट आधुनिक तंत्रज्ञान आणि शस्त्रक्रिया कौशल्यामधील दरी भरून काढत रोबोटिक तंत्रज्ञानामुळे साध्य होत असलेली अचूकता देशभरातील आरोग्यसेवेचे मानक बनेल हे आहे.

डॉ.रोहित लुथ्रा म्हणाले की,स्ट्रायकरशी सहयोग करून भारत आणि जगभरातील सांधेरोपणामध्ये एक नवा मापदंड प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे.जेणे करून त्याचा फायदा सर्वांना होऊ शकेल.

स्ट्रायकर चे उपाध्यक्ष व भारतातील सरव्यवस्थापक अमन ऋषी म्हणाले की स्ट्रायकरची आर्कस हॉस्पिटलशी भागीदारी ही आरोग्यसेवा अधिक सुधारण्यासाठी सर्वोत्कृष्ट रोबोटिक तंत्रज्ञान उपलब्ध करत रुग्ण व वैद्यकीय चिकित्सक या दोघांसाठीही दीर्घकालीन सकारात्मक प्रभाव पडण्याच्या आमच्या उद्दिष्टांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे.

अँटिरियर ॲप्रोच (DAA) तंत्रामुळे शस्त्रक्रिया अधिक सुलभ

बायलॅटरल रोबोटिक हिप रिप्लेसमेंट विथ अँटिरियर ॲप्रोच या तंत्राद्वारे अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणारे आर्कस हॉस्पिटल हे भारतातील पहिल्या हॉस्पिटलपैकी एक आहे. आर्कस हॉस्पिटलमधील अशा प्रकारची पहिली शस्त्रक्रिया ऑक्टोबर 2023 मध्ये केली गेली.त्यानंतर 650 हून अधिक प्रक्रिया या तंत्राने करण्यात आल्या.यात रोबोटिक प्रणालीच्या साहाय्याने व रोबोटिक प्रणाली शिवाय अशा दोन्ही प्रकारच्या प्रक्रियांचा समावेश आहे.

डॉ.रोहित लुथ्रा पुढे म्हणाले की, अँटेरियर अ‍ॅप्रोच या तंत्राला फ्रंट अ‍ॅप्रोच असे देखील म्हणतात.ही कमीत कमी चिरा असणारी प्रक्रिया असून यात नुकसान झालेल्या हाडांपर्यंत पोहचण्यासाठी स्नायू कापावे लागत नाही. पुढील बाजूने कमीत कमी चिरा करत झिज झालेली हाडे व सांधे काढून योग्य ठिकाणी रोपण केले जाते. यामध्ये स्नायूंना कुठलेही नुकसान न झाल्याने रूग्णाला शस्त्रक्रियेनंतर अल्पावधीतच आपले वजन पेलवत चालू शकता येते. रोबोटिक प्रणालीमुळे रोपण योग्य जागी बसवून अचूकता साधता येते. रुग्णाच्या खुब्याच्या रचनांनुसार हे रोपण बसविले जाते व रोपण विस्थापित होण्याची शक्यता नगण्य असते. रोबोटिक प्रक्रिया करताना अचूकता आणि सुरक्षिततेसाठी योग्य नियोजन करता येते. रोपणाचा योग्य आकार शस्त्रक्रियेआधी सीटी स्कॅन करून ठरविला जातो. सीटी स्कॅन झाल्यानंतर खुब्याचे थ्रीडी प्रारूप तयार केले जाते. एका कुशीवर इतर प्रक्रियांप्रमाणे रूग्ण नसल्यामुळे आणि पाठीवर झोपता येत असल्याने खुब्याची लांबी अचूकतेने मोजता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी