May 16, 2026

खग्रास चंद्रग्रहणामुळे दत्त महाराजांच्या मूर्तीला श्वेत वस्त्राचे आच्छादनकै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट

0
IMG-20260303-WA0047
Spread the love


पुणे : खग्रास चंद्रग्रहण असल्याने बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरातील दत्तमहाराजांच्या मूर्तीला पांढऱ्या वस्त्राने आच्छादन करण्यात आले. ग्रहण पर्व काळामध्ये मंदिर बंद होते आणि दत्तमहाराजांचे केवळ मुख व चरण दर्शन मंदिराबाहेरुन भाविकांना घेता आले.

ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, ग्रहण स्पर्श दुपारी ३ ते ग्रहणमोक्ष सायंकाळी ७ असा ग्रहणाचा एकूण पर्वकाळ चार तासांदरम्यान होता. त्यामुळे या कालावधीत मंदिराच्या धार्मिक परंपरेनुसार दत्त महाराजांच्या मूर्तीवरील सर्व अलंकार व पोशाख उतरवून श्री दत्तमहाराजांचे मूर्तीस नूतन श्वेत वस्त्र परीधान करण्यात आले.

यावर्षातील हे पहिले चंद्रग्रहण आहे. मंदिराच्या धार्मिक परंपरेनुसार ग्रहण पर्व काळात जलधारांनी अभिषेक, जपजाप्य, मंत्र पुरश्चरण इत्यादी सर्व धार्मिक कार्यक्रम झाले. ग्रहण पर्व काळामध्ये कोणतेही हार, पेढे वा इतर नैवेद्य मंदिरात स्वीकारले गेले नाहीत. मंदिरातील सेवकरी व पुजा-यांनी ग्रहण पर्व काळामध्ये मंदिरात जप देखील केला. तसेच श्री दत्त महाराजांना ग्रहण काळात संततधार जलाभिषेकही सुरू होता . ग्रहण मोक्ष झाल्यानंतर दत्तमहाराजांची पुन्हा षोडोपचार पूजा करुन नूतन पोशाख परिधान करण्यात आला.

  • फोटो ओळ : खग्रास चंद्रग्रहण असल्याने बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात दत्तमहाराजांच्या मूर्तीला श्वेत वस्त्राने आच्छादन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी