September 12, 2026

हॉटेल गोकुळच्या मालकाकडे दरमहा ५० हजारांची खंडणी मागितल्याचा आरोपपैसे न दिल्यास हॉटेलचे नुकसान करण्याची धमकी; कोंढवा पोलिसांकडे तक्रार

0
IMG-20260912-WA0014
Spread the love

पुणे : कोंढवा परिसरातील हॉटेल गोकुळच्या मालकाकडे दरमहा ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मागणी केलेली रक्कम न दिल्यास हॉटेलचे नुकसान करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप हॉटेल मालकाने केला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हॉटेलच्या बाहेरील मोकळ्या जागेच्या वापराच्या कारणावरून संबंधितांकडून दरमहा ५० हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हॉटेल मालकाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर हॉटेलमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून भिंत व टाइल्सचे नुकसान करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच हॉटेलचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकारामुळे हॉटेल मालकाचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. सातत्याने पैशांची मागणी आणि धमकी दिल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

या प्रकरणी चंद्रकांत जैन, प्रवीण ऊर्फ पोपट ओसवाल, गणेश कर्णावट, अतुल कर्णावट, ऋषभ मेहता यांच्यासह अन्य तीन अनोळखी व्यक्तींविरोधात तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत संबंधित प्रकरणाचा तपास सुरू केला असून, या आरोपांमागील नेमके तथ्य काय आहे, याचा तपास करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी