प्रती,मा. मनोज पाटील,सह पोलीस आयुक्त,पुणे
मा. संदीप भाजीभाकरे,
पोलीस उपयुक्त वाहतूक.
मा. अनिरुद्ध पावसकर,
मुख्य नगर अभियंता,
बांधकाम विभाग, पुणे मनपा.
विषय – 1) एरंडवण्यातील पांडुरंग कॉलनीतील व्यवसायिक इमारतीच्या पार्किंगची जागा खुली करण्याबाबत…
2) इमारतीचे पार्किंग खुले नसताना दुचाकींवरील कारवाई अन्याय्य…
मा. महोदय,
एरंडवण्यातील पांडुरंग कॉलनीतील स. नं. 36/17 येथील व्यवसायिक इमारत ( ज्यात झुडिओ, बँक व इतर आस्थपने आहेत ) येथील पार्किंगची जागा संबंधित बांधकाम व्यवसायिकाने अद्याप खुली केलेली नाही. त्यांच्या कडे पाठपुरावा केला असता प्रत्येक वेळी ते 15 दिवसात खुलं करतो, तेथील सामान हलवितो असे आश्वासन देतात.
एकीकडे संबंधित बांधकाम व्यवसायिक पार्किंग ची उपलब्ध करून देत नाही दुसरीकडे वाहतूक पोलीस तेथे खरेदीस आलेल्या नागरिकांना दंडित करतात. नागरिक बिचारे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतात.
पांडुरंग कॉलनीतील नागरिक देखील ह्या सर्व त्रासाला कंटाळले असून मनपा आणि पोलिसांच्या संगनमताने हे घडतंय कां असा संशय यावा इतपत मिलीभगत दिसते.
तरी संबंधित बांधकाम व्यवसायिकाकडून सदर पार्किंग ची जागा त्वरित खुली करण्यासाठी मनपा ने तंबी द्यावी आणि ती जागा खुली होईपर्यंत दुचाकीस्वारांवर कारवाई करू नये अशी आग्रही मागणी करत आहे.
( सोबत श्री. रुपेश केसेकर यांनी काढलेला कारवाई चा व्हिडीओ आणि पार्किंग चे छायाचित्र जोडत आहे )
आपला,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष,क्रिएटिव्ह फाउंडेशन.
मो – 9850999995
