दगडूशेठ गणपती ट्रस्ट तर्फेगणेशोत्सव काळात३ वैद्यकीय सेवा कक्ष
आय सी यू चाही समावेश
पुणे : गणपती बाप्पा च्या दर्शनासाठी लक्षावधी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे उत्सव मंडप परिसरात तीन वैद्यकीय सेवा कक्ष उभारण्यात येणार असून त्यात आयसीयू सेवेचा समावेश असेल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
हे वैद्यकीय सेवा कक्ष गणपती च्या आगमनापासून विसर्जन मिरवणुकीपर्यत चालू रहातील. गणपती मंदिर, गेट नंबर १ येथे प्रथमोपचार केंद्र, गणपती मंदिराच्या शेजारी आय सी यू व्हेंटिलेटर बेड सुविधा, बेलबाग चौक येथे आय सी यू व्हेंटिलेटर बेड सुविधा, मंडप परिसरात ५ ठिकाणी अद्ययावत कॉर्डिॲक रुग्णवाहिका सुविधा तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी व्हिलचेअर सुविधा रहातील, उत्सव काळात रोज ५५ जणांचे वैद्यकीय पथक कार्यरत राहील. या वैद्यकीय सेवेसाठी महाराष्ट्र शासनाच्या पाच कॉर्डिॲक रूग्णवाहिका आणि ट्रस्ट च्या चार रूग्णवाहिका सेवेत असतील. मिरवणुकीच्या दिवशी पांचाळेश्वर घाटावर चार रुग्णवाहिका सेवेत असतील. त्यात प्राथमिक उपचार केले जातील, अशी माहिती सुनील रासने यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
गणपती बाप्पा च्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची आरोग्य सुरक्षितता राखणे ही ट्रस्ट ची जबाबदारी आम्ही मानतो. त्याच भावनेने गेली चार वर्षे उत्सवकाळात आयसीयू सेवा कक्ष चालविला. या सेवेत विस्तार करून चार केंद्र आणि विसर्जन घाटावर रुग्णवाहिका अशी व्यवस्था यंदा केली आहे.
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक, पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग आणि शहरातील नामांकित रुग्णालयांचा या वैद्यकीय सेवेत सहभाग असतो. दगडूशेठ ट्रस्टचे विश्वस्त आणि सुवर्णयुग तरूण मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी या उपक्रमाचे व्यवस्थापन पहातात, असे सुनील रासने यांनी सांगितले. सर्व कक्षांच्या समन्वयाचे काम ट्रस्ट च्या वैद्यकीय सेवा कक्षाचे व्यवस्थापक राजेंद्र परदेशी आणि त्यांचे सहकारी पाहतात, अशी माहिती सुनील रासने यांनी दिली आहे.
आपत्कालीन वैद्यकीय हेल्पलाइन क्रमांक:
9881516517 / 9923516517
कळावे.
सुनील रासने,
अध्यक्ष,
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट.
अधिक माहितीसाठी संपर्क :-
वैद्यकीय सेवा व्यवस्थापक,
राजेंद्र परदेशी,
९९२२२ ६२१७४
