May 15, 2026

नीट परीक्षा ,बेजबाबदार सरकार , निषेध निषेध निषेध

0
sanvidhan_news_150x150
Spread the love



जीवनाचे स्वप्नं, ध्येय उराशी बाळगून, वर्षानुवर्षे रात्रंदिवस अभ्यास करून विद्यार्थी/ विद्यार्थिनी ” नीट परीक्षा “उत्तीर्ण होण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सामोरे जात असतात …त्या परीक्षेसाठी पालक आपल्या मुलांच्या भवीतव्याचा विचार करता लाखो रुपये खर्च करतात….पण एकार्थी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे त्या नीट परीक्षेचा पेपर फुटतो त्याची लाखो रुपयांची विक्री होते , तपास यंत्रणा कामाला लागते…आणि त्या परीक्षा रद्द करण्यात येतात…यात त्या प्रामाणिक विद्यार्थ्यांचा काय दोष ? यात त्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा,स्वप्नाचा, कष्टांचा,आणि पालकांच्या लाखो रुपयांचा चुराडा होतो असेच म्हणावे लागेल …या अशा प्रकरणांमुळे तरुणाई शिक्षणापासून भरकटली जाते, आता जगण्यात काय अर्थ नाही अशा विचारांनी त्या विद्यार्थ्यांचे अक्षरशः मानसिक संतुलन बिघडते, आणि अनेक विद्यार्थी/ विद्यार्थिनी आत्महत्याच्या विचाराकडे धाव घेतात… याला सर्वस्वी जबाबदार कोण ? या प्रश्नावर फक्त एकच उत्तर ….सरकार आणि बेजबाबदार सरकारच….
यावर सरकारने ही नीट परीक्षा रद्द करून बारावीच्या विशेष टक्केवारीवर पुढील वैद्यकीय प्रवेश निश्चित करावा अशी आमचे बॉऊंडलेस स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने या प्रसिद्धी पत्रकाद्वारे राज्य सरकारकडे करीत आहोत…. आपले लतेंद्र भिंगारे अध्यक्ष, बॉऊंडलेस स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी